Home राजकारण पदवीधर मतदार संघ नागपूर विभागाची निवडणूक चुरशीची होणार!!

पदवीधर मतदार संघ नागपूर विभागाची निवडणूक चुरशीची होणार!!

162

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179

 

चिमूर- नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदारांची नोंदणी आता सुरू झालेली आहे. या निवडणुकीत कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेला व्यक्ती मतदार होवू शकतो.

कला, वाणिज्य, विज्ञान, मेडीकल, इंजिनिअरिंग, फाॅर्मसी, कृषी वा अन्य कोणत्याही शाखेची पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला व्यक्ती पदवी प्राप्त करून दोन वर्षे झाली असेल तर फाॅर्म भरून तो मतदार होवू शकतो. हा फाॅर्म नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया,वर्धा या जिल्ह्यातील कोणत्याही तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातून प्राप्त होवू शकतो. या अर्जासोबत पदवी, पदव्युत्तर केल्याची झेराॅक्स, नसेल तर गुणपञिका, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व निवडणूक मतदार ओळखपञ इ.जोडणे आवश्यक आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सध्या काँग्रसचे अभिजित वंजारी हे आहेत. यापूर्वी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे वडील स्व.गंगाधरराव फडणवीस, त्यानंतर केंद्रीय मंञी नितीनजी गडकरी यांनी पदवीधर मतदार संघ नागपूर विभागाचे आमदार म्हणून कार्य केले. मागीलवेळी भारतीय जनता पक्षाने नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. परंतू वारंवार एकाच जातीचा उमेदवार या मतदार संघातून दिल्या जात असल्यामुळे मतदारात नाराजी निर्माण झाली व संदीप जोशी यांचा पराभव झाला. आता ते राज्यपालाकडून नामनिर्देशित विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले आहेत.
यावेळेस पदवीधर मतदार संघ नागपूर विभागाची निवडणूक २०२६- २०२७ मध्ये होईल असा अंदाज वर्तविल्या जातो. पदवीधर मतदार संघातील आमदाराने पदवीधरांचे प्रश्न सोडविले पाहिजे. जसे बेरोजगारी, बेरोजगारी भत्ता, पदवीधरांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास शासनाला बाध्य करणे, सुशिक्षित, कर्मचारी, शिक्षक यांचे प्रश्न सोडविले परंतू पाहिजे त्या प्रमाणात ही अपेक्षा पूर्ण होत नाही. सध्याचे आमदार अभिजित वंजारी यांच्याकडूनही ह्या अपेक्षा पूर्ण झालेल्या दिसत नाही. केवळ एक ओबीसी उमेदवार म्हणून मतदारांनी त्यांना निवडून दिले.
यावेळेस भाजपाही ओबीसी उमेदवार देणार असे कळते. अभिजित वंजारी हे तेली समाजातून येतात ते मूळचे नागपूरचे आहेत व त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळते. तर यावेळी भाजपकडून माजी आमदार व नागपूरच्या उदयनगरचे रहिवाशी असलेले सुधाकर कोहळे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. व कोहळे हे कुणबी समाजातून येतात. विदर्भातील पाचही जिल्ह्यात दोन्ही समाज फार मोठ्या संख्येने आहेत. या समाजाचे भरपूर मतदार पदवीधर आहेत. या मतदार संघात जो उमेदवार जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करतो.त्याचा विजय निश्चित मानला जातो. सध्या नोंदणीचे काम जोरात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यालयात मतदार नोंदणी फाॅर्म तालुका स्तरापर्यंत उपलब्ध झालेले आहेत व मतदाराची नोंदणी सुरू झालेली आहे. दोन्ही पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झालेली आहे.या मतदार संघात अन्य उमेदवारही राहतील पण ते फारसा प्रभाव पाडू शकणार नाही परंतू ते निवडणुकीचे गणित बदलवू शकतात हे माञ नक्की! या मतदार संघात सर्वात महत्त्वाचा ठरतो तो चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्याची संख्या फार मोठी असल्याने हा जिल्हा निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतो. सध्या चंद्रपूर जिल्ह्याची परिस्थिती पाहू जाता भाजपाचे पाच आमदार, काँग्रसचे एक आमदार व एक खासदार अशी आहे. या निवडणुकीत जात हा फॅक्टर चालू शकतो. परंतू अन्य जातीवरही विजयाचे गणित ठरू शकते. या निवडणुकीत कोण बाजी मारतो तो येणारा काळच ठरवेल! सध्या जबरदस्त मोर्चेबांधणी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here