


उच्च शिक्षण घेणारा सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा संघटित होता. आता त्याचा मुलगा, मुलगी उच्च शिक्षण घेऊन असंघटित कंत्राटी कामगार झाला आहे. पुढचा भविष्यकाळात २०३३ पर्यन्त या सर्व सामान्य पालकांची व्यथा ऐकणार कोणी नसेल. काल त्याला वाटत होते. माझा मुलगा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतोय. खूप हुशार आहे. आता ८ वी ला आहे. वार्षिक फी एक लाख रुपये आहे. खूप मस्त चालू आहे. भविष्यात तो १० वी झाला, की मोठ्या शहरात किंवा इतर मेट्रो ठिकाणी त्याला ठेवेन. छान क्लास लावेन वार्षिक फी पाच-सहा लाख भरावे लागले तरी चालेल. पोरगा आता मेट्रो सिटीत १२ वी ला शिकत आहे. छान क्लास लावला आहे. वार्षिक सहा लाख ट्युशन फी आहे. पोरगा चांगल्या गुणाने पास झाला. नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात ॲडमिशन मिळालं. चांगल्या गुणाने पास पण झाला. आता नोकरीचे डोहाळे त्याला लागले.
नऊ एजन्सी कडून अर्ज केले तेव्हा त्यांच्या मार्फत त्याची शासकीय पदावर कनिष्ठ अभियंता म्हूणन निवड झाली. (राज्य सरकारने टेंडर दिलेल्या कंपन्या) बाप खुश झाला. एक महिन्याने पोराच्या हातात पगार आलं. पोरगा आनंदात घरी आला. पप्पा आज पगार झाला. बाप आनंदी झाला. बाप म्हणाला बाळा पहिला पगार आहे, देवापुढे ठेव. पोरानं देवाच्या फोटो समोर ठेवला, आणि पाया पडला. दुसऱ्या दिवशी ते पगाराचे पैसे घेऊन बाप पैसे मोजू लागला. अन् कपाळाला हात लावून बसला. बघतो तर काय? पगार फक्त ३०,००० /- रुपये. मग बाप ओरडला, “एवढं तुझ्या शिक्षणावर खर्च केले ते काय या तुटपुंज्या, इतक्याशा पगारासाठी?” मग पोरगा म्हणाला, “पप्पा शासकीय नोकरीत आता पहिल्यासारखं, तुमच्या काळातल्यासारखं राहिलं नाही. तुमच्यावेळी कसी पर्मनंट नोकर भरती व्हायची. स्केल मिळायचं. तशी भरती झाली असती, तर आज मला १,५०,००० पर्यंत पगार राहिला असता. आता कंत्राटी पद्धतीने कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्त्या व्हायला लागल्या.
आता मात्र बाप आठवू लागला, जेव्हा २०२२-२०२३ मध्ये मी संघटित कामगार कर्मचारी अधिकारी असतांना खाजगी करणाच्या विरोधात पेटून उठलो असतो. आणि रस्त्यावर उतरलो असतो, तर आज हा दिवस आला नसता.परंतु त्याच वेळेस शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटी, खासकीकरण करणारा कायदा पास करण्यात आला होता. त्यावेळेस मी व माझ्या संघटनेने ट्रेड युनियन महासंघाने पेन्शनऐवजी या खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या विरोधात निदर्शने केली असती, तर आज ही वेळ माझ्या मुलामुलीवर आली नसती!. जेव्हा हे पोराला समजते तेव्हा ते पोरगं बापाला म्हणतो त्याचवेळेस पेन्शनच्या गोष्टीत नाक न खुपसता खासगीकरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरला असता, तर आज माझ्यासारख्या मुलांचे एवढे नुकसान झाले नसते. आणि मला पण आज पेन्शन लागू झाले असते. तो बाप शरमेने मान खाली घालून बसून होता. तोपर्यंत वेळ निघून गेला होता.
आज २०२६ ला ही परिस्थिती आहे तर विचार करा २०३३ काय परिस्थिती असेल.आता ही वेळ जाण्यास तयार आहे. कामगार, कर्मचारी आणि अधिकारी असणाऱ्या व सर्वसामान्य नागरिकांनो लोकांनो,विरोध करायचा असेल, तर या कंत्राटीकरण, खासगीकरण करणाऱ्या सरकारला विरोध करा. देशाच्या निर्णय प्रक्रियेत असलेल्या उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी हेच धोरणकर्ते असतात. त्यांनी भविष्याचा विचार केला पाहिजे.तुम्ही सेवा निवृत झाल्यावर समाज तुम्हाला माफ करणार नाही. भांडवलदारांच्या हाताचे बाहुले झालेल राज्य व केंद्र सरकार आय टी (IT) सेलच्या कार्ट्यांच्या भडकाऊ, भ्रमित करणाऱ्या गर्व से कहो हम हिंदू , हिंदू खतरे मे, लव जिहाद, देश भक्ती, मुस्लिम द्वेष भावना भडकवणाऱ्य मेसेजच्या आहारी जाऊन स्वतःच्या मुलाबाळांचे, आपल्या भावी पिढ्यांचे नुकसान आपणच करून घेत आहोत.त्यामुळे आमची 100 टक्के वाटचाल गुलामीकडे चाललेली आहे. म्हणूनच सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेत कर्मचारी अधिकारी लोकांनी सावधान झाले पाहिजे.आज तुमच्याकडे किती जमीन, शेती, सोने, गाडी, बंगला पोपर्टी आहे. कोणी विचारणार नाही. तुम्ही देशासाठी समाजासाठी काय केले हे विचारले व लिहल्या जाणार आहे.भारतातील अनेक सुशिक्षित लोकही कर्मचारी अधिकारी वर्गाने खाजगीकरणाला फारच हलक्यात घेतले.अदानी अंबानीचा खासगीकरणाचा हा “गुलामीचा पेंच” आहे जो हळूहळू तुमचा गळा घट्ट करत चालला आहे.
आता तो काळ दूर नाही जेव्हा इतिहास शिकवला जाईल जो भारताची शेवटची सरकारी रेल्वे,शेवटची सरकारी एंस टी बस,शेवटची सरकारी वीज कंपनी, शेवटचा सरकारी हॉस्पिटल, सरकारी महाविद्यालय, शेवटचा सरकारी विमानतळ आणि शेवटचा सार्वजनिक उद्योग कोणता होता ?. कोणत्याही सरकारी उपक्रमाचे किंवा सरकारी संस्थांचे खाजगीकरण झाल्यास सामान्य जनतेच्या मौनाचा एक दिवस संपूर्ण देशाला महागात पडेल.कारण जेव्हा सर्व शाळा,सर्व रुग्णालये,सर्व रेल्वे स्टेशन,विमानतळ, वीज,पाणी,सर्व खाजगी हातात असेल,तेव्हा तुम्हाला दिसेल की हुकुमशाही म्हणजे काय ?. लक्षात ठेवा की, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हे सरकार आणि सरकारी उपक्रमांचे उद्दिष्ट असते. तर खाजगी संस्थांचे उद्दिष्ट किमान खर्चासह जास्तीत जास्त नफा मिळवणे असते.हे सर्वच लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.
उदाहरणार्थ,जिल्हा परिषद शाळा बंद केल्या आणि त्यामुळे आज खाजगी शाळा,खाजगी रुग्णालये यांची स्थिती पहा!
सामान्य माणसाचे घर,घर आणि जमीन आत शिरताच विकली जाईल. खाजगीकरणाच्या षडयंत्रावर देशातील जनतेचे मौन देशाला काही उद्योगपतींचे गुलाम बनवण्याच्या धोरणात सहाय्यक आहे.त्यामुळे तुम्ही जागे व्हा आणि तुमचा देश आणि देशाची सार्वजनिक संपत्ती वाचवा.रेल्वे वाचवावी लागेल,सरकारी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था वाचवाव्या लागतील,सरकारी वीज कंपनी (एम.एस.ई.बी), एलआयसी, बीएसएनएल, एअर इंडिया आणि टपाल कार्यालये वाचवावी लागतील, सरकारी कर्मचारी आणि सरकारी विभाग वाचवावे लागतील.नैसर्गिक आपत्काली अडचणीत फक्त सरकारी विभागच कामाला येतात,कोणतेही खाजगी विभाग काम करत नाही,ज्याचे उदाहरण तुम्ही अलीकडेच पाहिले असेल. किती खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांवर मोफत किंवा किमान दराने उपचार करत होती.किती खाजगी बस मजूर,कामगार आणि विद्यार्थ्यांना घेऊन जात होत्या?. किती खाजगी संस्था आणि स्वयंसेवी संस्था जमिनीवर उतरून जनतेला मदत करत होत्या?. कोविड काळामध्येही कोणत्या खाजगी विमान कंपन्या भारतीयांना विमान प्रवास करू देत होत्या?.चार पटीने विमान भाडे आकरल्या जात होते.तालिबानमध्ये घुसल्यानंतर किती खाजगी वैमानिकांनी देशवासियांना बाहेर काढले ?.
त्यामुळे प्रत्येकाने त्यावेळी खाजगीकरणाला विरोध केला पाहिजे होता,आज आणि येणाऱ्या काळात फक्त काही उद्योगपती हा देश चालवतील आणि पूर्व भारताचे युग पुन्हा येईल,लोकशाहीने देशाची राजकीय सत्ता एका विशिष्ट विचारधारेच्या पक्षाकडे नेत्याकडे आहे हे दिसते. पण बारा वर्षात नवीन काय केले हे सांगता येत नाही. राजकीय शक्ती फक्त एक दिखावा आहे.ही वस्तुस्थिती खाजगीकरणामुळे लोकांना समजण्यास सक्षम आहे. कारण काही लोक सत्य स्वीकारत नाही. ते स्वताच्या मनाशी खेळत आहेत. दोनच मार्ग आहेत एकतर तुम्ही अंबानी अदानीसारखे मोठे उद्योगपती व्हा!. हे जे शक्य नाही किंवा सार्वजनिक संस्थांना अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, जेणेकरून गरीब आणि मध्यमवर्गीय जगू शकतील. त्याच प्रमाणे सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या कर्मचारी अधिकारी लोकांचे मूल मुली,सर्व नातलग खाजगीकरणामुळे होणाऱ्या परिणामाची शिक्षा भोगतील.
✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९















