Home महाराष्ट्र पार्डीच्या गौरी गरडची सीईटी परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

पार्डीच्या गौरी गरडची सीईटी परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

14

▪️पार्डीच्या गौरी गरडची सीईटी परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.17जून):-पुसद तालुक्यातील पार्डी येथील प्रगतिशील शेतकरी अजय श्रीराम गरड यांची कन्या गौरी हिने सीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करित ९९ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शालेय जीवनापासूनच अभ्यासू व जिद्दी स्वभावाची असलेल्या गौरीने नियमित परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळविले. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून तिने पार्डी गावासह पुसद तालुक्याचे नाव उंचावले आहे. तिने अकरावी व बारावीचे शिक्षण श्री. मनोहरराव नाईक विद्यालय पार्डी येथे झाले आहे पुढील शिक्षणासाठी तिने आय.आय.टी. प्रवेश घेणार असल्याचे सांगितले आहे.

गौरीच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here