Home चंद्रपूर गोविंदराव वारजूकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आठवडा उत्साहात साजरा

गोविंदराव वारजूकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आठवडा उत्साहात साजरा

129

 

संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378

 

 

नागभीड- गोविंदराव वारजूकर कला, वाणिज्य महाविद्यालय, नागभीड येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने 22 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत “राष्ट्रीय सेवा योजना आठवडा” विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. या आठवड्याभरात सामाजिक भान, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागृती, देशभक्ती आणि राष्ट्रनायकांचा गौरव अशा विविध विषयांवर आधारित कार्यक्रम राबवण्यात आले. आठवड्याची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त ‘विद्यार्थीप्रिय प्राध्यापक निवड’ उपक्रमाने झाली. विद्यार्थ्यांच्या मतदानातून डॉ. दिपक मोरांडे यांची निवड झाली व त्यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. 23 सप्टेंबरला सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त कलम 370, कारगिल विजय दिवस आणि ऑपरेशन सिंदूर यावरील माहितीपट दाखविण्यात आले. शिवटेकडी परिसरात नगर परिषदेच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
24 सप्टेंबर रोजी NSS स्थापना दिवसानिमित्त स्वामी विवेकानंद मतीमंद, अनाथ व बालसुधार गृहाला भेट देण्यात आली. या वेळी चित्रकला स्पर्धा, समुपदेशन व फळवाटप करण्यात आले. 25 सप्टेंबर रोजी अंत्योदय दिवसानिमित्त “विकसित भारताचा मार्ग – अंत्योदयाकडून सर्वोदयाकडे” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत संकेत सोंडवले आणि पूजा कोरे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. 26 सप्टेंबर रोजी ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील डिव्हायडर भागात वृक्षारोपण करण्यात आले. यासोबतच ‘वृक्षारोपण व देहदान’ या विषयावर पथनाट्यही सादर करण्यात आले. 27 सप्टेंबरला ‘विश्व पर्यटन दिवस’ निमित्त ‘हिंदवी स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास’ या विषयावर डॉ. अनमोल शेन्डे यांचे व्याख्यान झाले, तर 28 सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारक जीवनावर डॉ. गणेश सांगोळकर यांनी मार्गदर्शन केले. 29 सप्टेंबर रोजी ‘विश्व हृदय दिवस’ साजरा करत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आला. यात रक्तदाब, साखर, रक्तगट, बीएमआय आणि हृदयविषयक प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या.
या संपूर्ण आठवड्यात स्वयंसेवक आणि नागरिकांचा उत्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंग, रासेयो समन्वयक डॉ. चंद्रशेखर हनवंते व कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here