Home Breaking News मारडा व परिसरातील शेतकऱ्यांची सरसकट मदतीची शासनाकडे मागणी, तहसीलदार मार्फत शासनाला सोपवले...

मारडा व परिसरातील शेतकऱ्यांची सरसकट मदतीची शासनाकडे मागणी, तहसीलदार मार्फत शासनाला सोपवले निवेदन

129

-राजुरा (प्रतिनिधी ):- मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी ने राजुरा भागातील बहुतेक क्षेत्रातील पीक नष्ट झाले असून शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न येण्याची शकत्या पूर्णपणे मावळली असल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे, प्रशासनाद्वारे सर्वे व पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु असली तरी प्रशासनातील कर्मचारी जाणीवपूर्वक झालेल्या नुकसानी पेक्षा कमी नुकसान दाखवत असल्याने तालुक्यातील शेतकरी योग्य नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव असून मागील काळात इतर तालुक्याच्या तुलनेत राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना अल्प मदत मिळाल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता सरसकट नुकसान भरपाई ची मागणी करत कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्यास नकार दिला होता, आज ह्याच मागणीला घेऊन माजी जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे ह्यांच्या नेतृत्वात मारडा व परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार राजुरा ह्यांना निवेदन देऊन सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली, तहसीलदार श्री गौड ह्यांनी शेतकऱ्यांची मागणी समजावून घेऊन शेतकऱ्यांना त्यांची भावना सरकारपर्यंत पोहचवण्याबाबत आश्वास्त केले त्याच बरोबर नुकसानभरपाई बाबत शासनाच्या निकषाची माहिती देऊन ह्याबाबत झालेल्या नुकसानीची योग्य ती माहिती शासनापर्यंत पोहचणे गरजेचे असल्याने आलेल्या कर्मचाऱ्यांना पंचनामे करू देण्याची विनंती केली त्याच बरोबर सदर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून कुठली हलगर्जी किंवा भेदभाव होत असल्यास आपल्याशी संपर्क करण्याबाबत ही सूचित केले, सुनील उरकुडे ह्यांनीही शेतकऱ्याच्या सरसकट नुकसानभरपाई च्या मागणीचे समर्थन करतानाचं प्रशासणाला सहयोग करण्याचे आवाहन केले, निवेदन देताना सुनील उरकुडे ह्यांच्या सह मारडा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची उपासस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here