Home मुंबई हजारोंना शासकीय नोकरीसाठी मार्गदर्शन करणारे स्टडी सर्कल नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमीने (SCNOA) रचले...

हजारोंना शासकीय नोकरीसाठी मार्गदर्शन करणारे स्टडी सर्कल नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमीने (SCNOA) रचले अनेक विक्रम;अनिल जायभाये बीडकर

162

 

 

 

 

 

जगदीश का. काशिकर, विशेष प्रतिनिधी, मो. ९७६८४२५७५७.

 

मुंबई: देशभरात आणि महाराष्ट्रात नर्सिंग क्षेत्रासाठी शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या स्टडी सर्कल नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमी (SCNOA) ने आजवर 10000+ नर्सेसना शासकीय आणि परदेशातील नोकऱ्यांमध्ये स्थायिक करून एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, केवळ 2024 मध्येच या अकॅडमीच्या 501 विद्यार्थ्यांची निवड शासकीय नर्सिंग सेवेसाठी झाली असून ही बाब नर्सिंग क्षेत्रातील नवउमेदवारांसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे.

या अकॅडमी चे संस्थापक श्री. अविनाश अशोक ब्राम्हणे सर हे स्वतः इंडियन नेव्ही, रक्षा मंत्रालय अंतर्गत सिनियर नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.याआधी त्यांनी राज्य व केंद्रीय 16-17 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये मेरिट मध्ये उत्तीर्ण होऊन, नर्सिंग क्षेत्रातील अत्यंत योग्य नेतृत्व आणि मार्गदर्शन मिळवले आहे.गेल्या 10 वर्षांपासून ते इंडियन नेव्ही अंतर्गत नर्सिंग सेवेतील उच्चतम जबाबदारी पार पाडत आहेत आणि त्यांच्या विस्तृत अनुभवामुळेच आज SCNOA एक प्रगल्भ संस्था बनली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, SCNOA विद्यार्थ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रशिक्षण, मार्गदर्शन देत आहे.

श्री.अविनाश ब्राह्मणे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे SCNOA ने 2024 मध्ये अधिकृत अँप लाँच केले असून, त्यावरून अल्पदरात Test Series, Updated Notes, आणि Mock Exams उपलब्ध करून दिले आहेत.
ही सुविधा विशेषतः DMER, DHS, ESIC, AIIMS आणि MNC,MUHS परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे.

राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय परीक्षांसाठीही मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे. SCNOA फक्त भारतातील परीक्षांसाठी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय नर्सिंग स्पर्धा परीक्षांसाठी देखील मार्गदर्शन करते. NCLEX, OET, IELTS, PROMETRIC, DHA, OSCE, HAD हे सर्व मार्गदर्शन प्रगत पद्धतीने, अनुभवी मार्गदर्शकांमार्फत आणि ग्लोबल स्टॅंडर्डनुसार केले जाते. त्यामुळे अनेक नर्सेस परदेशी सेवेत (Abroad Job) स्थायिक झाल्या आहेत.

या अकादमी मार्फत आतापर्यंत 10,000+ निवडी झाल्या आहेत. 501 फक्त 2024 मध्येच .आजपर्यंत SCNOA च्या माध्यमातून 10,000 पेक्षा जास्त नर्सेसना सरकारी व परदेशी नोकऱ्या मिळाल्या आहेत.ज्यात 2024 मधील 501 निवडी ही विशेष कौतुकास्पद बाब ठरते. या यशामागे आहे संस्थेची प्रश्नसंचावर आधारित Smart Practice A to Z मार्गदर्शन करत असते व फ्री paid learning चा योग्य समतोल देखील आखत असते.यामध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे नर्सिंग विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सतत अपडेट होत राहणारा अभ्यासक्रम तयार करणे हे प्रमुख वैशिष्ट आहे नर्सेस यांच्या कल्याणासाठी 24 तास कार्य करत असते SCNOA ही केवळ शैक्षणिक संस्था नसून नर्सेसच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युनियन्स सोबत सतत कार्य करत आलेली एक विश्वासार्ह ताकद आहे.

चर्चित 80:20 लिंगभेदी भरती घोटाळा असो किंवा नियमित वेतन, कामाचे तास, सेवा सुरक्षा, बदलीचे प्रश्न असोत — या सगळ्यावर संस्थेने सातत्याने कार्य करत आहे.

विद्यार्थ्यांचे अनुभव, यशाचा मंत्र
> “SCNOA मुळेच माझा अभ्यास योग्य पद्धतीने झाला, सराव उत्तम झाला आणि मी आज ESIC मध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे.” – विद्यार्थिनी, 2024 बॅच

> “Test series चं अचूकपण, notes चं simplicity आणि doubt-solving ची तत्परता — हे सगळं माझं यश घडवणारं होतं.” – विद्यार्थी, AIIMS Selected

SCNOA नर्सेससाठीचा एक प्रकाशस्तंभ आहे.सरकारी किंवा परदेशातील नोकरी मिळवणं हे केवळ स्पर्धा परीक्षा पास करणे नाही तर त्यासाठी योग्य मार्गदर्शन, विश्वास आणि जिद्द लागते.

स्टडी सर्कल नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमी हे या तीनही गोष्टींचं मूळस्थान ठरत आहे अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here