Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे होणार दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे होणार दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

106

 

चिमूर – सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय चिमूर आणि सिद्वी फाउंडेशन विशाखापटनम आंध्रप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 29 ते 30 सप्टेंबर 2025 रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचा विषय रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संगणक शास्त्रातील पर्यावरणपूर्वक नवसंकल्पना असून ही आंतरराष्ट्रीय परिषद सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजय भाऊ वडेट्टीवार तसेच किरण ताई वडेट्टीवार रोशनी विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या परिषदेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडणार आहे तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रोफेसर ए. श्रीनिवासा राव, सिनिअर सायंटिस्ट एवायआर स्टुडिओ बेथेस्डा, यूएसए आणि डॉ. डीक्सन अॅडॉम, क्वामे एनक्रमा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी घाना, डॉ. नामदेवराव बेलसरे, माजी प्राचार्य ब्रिजलाल बियानी महाविद्यालय अमरावती, डॉ. नागाबाबु अब्बाराजू सिद्वी फाउंडेशन हैदराबाद तर या उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रसाद खानजोडे प्राचार्य, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी तसेच प्राचार्य डॉ. सुनंदा एस. आस्वले, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर उपस्थित असतील.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रथम तांत्रिक सत्रासाठी व्याख्याते म्हणून डॉ. प्रशांत बोरकर जे.बी. सायन्स कॉलेज वर्धा यांना निमंत्रित करण्यात आले असून या सत्राचे अध्यक्ष डॉ. प्रशांत ठाकरे, रसायनशास्त्र विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर सहअध्यक्ष डॉ. अतुल नागपुरे राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय नागभीड हे असणार आहेत. दुसऱ्या तांत्रिक सेशनसाठी डॉ. कृष्णा कारू व डॉ. असलम सूर्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे अध्यक्ष आणि सहअध्यक्ष असतील.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवसी तृतीय सत्राला व्याख्याते म्हणून डॉ. विजय पावडे एलआयटी नागपूर अध्यक्ष म्हणून प्रा. अतुल येरपुडे नेही महाविद्यालय ब्रह्मपुरी तर सहअध्यक्ष म्हणून डॉ. अमोल नांदे, गुरुनानक कॉलेज बल्लारपूर हे उपस्थित राहणार आहेत. चौथ्या सत्रचे व्याख्याते म्हणून डॉक्टर गणेश केदार गणित विभाग प्रमुख रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर यांना आमंत्रित करण्यात आले असून अध्यक्ष म्हणून डॉ. राम नरेश शिषोदिया एसपी कॉलेज चंद्रपूर, सहअध्यक्ष अंकोश रामटेके ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या समारोपिय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीराम कावळे प्र-कुलूगुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि प्राचार्य डॉ. हेमराज लडके नीलकंठ राव शिंदे महाविद्यालय भद्रावती तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर सुनंदा आस्वाले हे स्थान भूषविणार आहेत.
या परिषदेच्या माध्यमातून देश-विदेशातील संशोधकांना आपले संशोधन सादर करण्याची संधी मिळणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारांचे आदानप्रदान होणार आहे.
ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी समन्वयक म्हणून डॉ. हुमेश्वर आनंदे, सहसमन्वयक प्रा. नागेश ढोरे, प्रा. समिरकुमार भेलावे, डॉ. वरदा खटी, डॉ. प्रणाली टेंभूर्णे, प्रा. प्रज्ञा खोब्रागडे, प्रा. स्नेहलकुमार कापसे तसेच महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. निलेश ठवकर व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी हे अथक परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here