Home महाराष्ट्र ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त 51 मुस्लिम बांधवांनी केले रक्तदान

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त 51 मुस्लिम बांधवांनी केले रक्तदान

130

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

गंगाखेड शहरातील तारू मोहल्ला येथील चिस्तीया कमिटीच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरील शिबिरामध्ये एकूण 51 मुस्लिम रक्तदात्यांनी आपले रक्तदान दिले.
चिस्तीया कमिटी तारू मोहल्ला पदाधिकाऱ्यांच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येत असते यावर्षीही गुरुवारी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकूण 51 मुस्लिम बांधवांनी आपले अनमोल रक्तदान करून योगदान दिले.सदरील शिबिरास परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी भेट देत कमिटीचे कौतुक केले आपल्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडावे अनमोल असे रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपण मोलाचे कार्य केले असल्याचेही यावेळी म्हटले.

चिस्तीया कमिटीच्या वतीने पोलीस अधीक्षक परदेशी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे,सपोनि आदित्य लोणीकर,सपोनि शिवाजी सिंगनवाड, पोउपनी व्यंकट गंगलवाड,नायब तहसीलदार मोहम्मद अजीज आदींसह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी बांधव उपस्थित होते.आलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांचे चिस्तीया कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here