Home चंद्रपूर महाराजा गणेश मंडळाची पंधरा वर्षांची परंपरा कायम-विसर्जन मिरवणुकीत राजुरा शहरात पहिल्यांदाच येणार...

महाराजा गणेश मंडळाची पंधरा वर्षांची परंपरा कायम-विसर्जन मिरवणुकीत राजुरा शहरात पहिल्यांदाच येणार बाहुबली हनुमान, शिव पार्वती

223

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

 

– विशेष रोड शो चे आकर्षण.

 

 

राजुरा (६ सप्टेंबर)- सर्वत्र गणेशोत्सवाची लगभग सुरू असताना राजुरा शहरात प्रथमच महाराजा गणेश मंडळाची विसर्जन मिरवणुकीच्या निमित्याने बाहुबली हनुमानजी, शिव पार्वती यांचा विशेष आकर्षक रोड शो चे आयोजन दिनांक ७ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. समूह संचालक सुमेध वाघमारे हे आपल्या चमूसह येणार आहेत. महाराजा गणेश मंडळ, उईके सब्जी मार्केट येथे गेल्या पंधरा वर्षांची परंपरा असलेल्या महाराजा गणेश मंडळाने विशेष रोड शो चे आयोजन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी , सदस्य यांनी या रोड शो ला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here