


*सातारा,खटाव,प्रतिनिधी :नितीन राजे (9822800812)*
ईद-ए-मिलाद खटाव मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, शिवसेना शिंदे गटाचे आ. महेश शिंदे यांनी जुलूस व धर्मगुरूंचे स्वागत करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.स.) यांची जयंती हा दिवस ईद-ए-मिलाद म्हणून सर्वत्र साजरा होतो. खटाव मध्ये सर्वप्रथम आज जुलूस चे आयोजन करण्यात आले, गावातील संघटना, मान्यवर व्यक्तींनी, जुलूस चे स्वागत करून सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद च्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुस्लिम समाज ट्रस्ट उपाध्यक्ष जहांगीर भाई खान यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.यावेळी गणेश भोसले, खटाव तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विवेक देशमुख, खटाव तालुक्यातील इतर मान्यवर उपस्थित होते.प्रशांत शिंदे सूत्रसंचालन,रसूल भाई मुल्ला,
यांनी केले.दिलावर शिकलगार यांनी आभार मानले कार्यक्रम चे आयोजन अमीन आगा,जमीर काझी ,शकील मणेर, युनुस मुल्ला,सलीम काझी, मुसा काझी,राजू शिकलगार मन्सूर काझी, आदी मान्यवर उपस्थित होते.













