


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.14जानेवारी):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सिपेट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे होते.
तर प्रमुख वक्ते म्हणून आयएमसी सदस्य दिलीप वावरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे राजकुमार हिवरे, एस. आर. एम. समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. किरणकुमार मनुरे तसेच तिजारे कार्पोरेशनचे संचालक स्वप्निल तिजारे , गटनिदेशक पी. आर. बोकडे, सौ. एस. पी. झाडे, एन. एन. गेडकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक गटनिदेशक सौ. सुचिता झाडे यांनी केले. प्रमुख वक्ते श्री. तिजारे यांनी मुलाखतीचे तंत्र या विषयावर विचार व्यक्त केले तर डॉ. प्रा. मनुरे यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. राजकुमार हिवरे यांनी युवा करिअर याविषयी मार्गदर्शन केले.प्राचार्य वानखेडे यांनी आपल्या भाषणातून जीवनात कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन निदेशक पियुष केने यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक एन.एन. गेडकर यांनी केले.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने लंगडी , लगोरी, फुगडी या सारख्या पारंपारिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाप की वरदान या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. आत्मनिर्भर भारत या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. संस्थेत नुकत्याच संपन्न झालेल्या संस्थास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या विजेत्यांना अतिथींच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.














