Home अमरावती भारत सरकारने डॉ.सुजाता काळेंच्या संशोधनाला पेटेंट मंजूर केल्याबद्दल विविध संस्था व संघटनांतर्फे...

भारत सरकारने डॉ.सुजाता काळेंच्या संशोधनाला पेटेंट मंजूर केल्याबद्दल विविध संस्था व संघटनांतर्फे सत्कार संपन्न.

167

 

अमरावती-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उपयोजित परमाणू विभागातील प्रा.डॉ. सुजाता निशिकांत काळे यांच्या ” फॅब्रिकेशन अँड कैरक्टेरायझेन ऑफ मेमरी युजिंग ६ बाय ६ ॲरी ऑफ मेमरीस्टर्स ” या विषयावरील संशोधनाला भारत सरकारने पेटंट मंजूर केल्याबद्दल सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंध टिम, वऱ्हाड विकास, फुले- शाहू- आंबेडकरी संघटना, उपेक्षित समाज महासंघ, कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तथा समाजभूषण संघटनेच्यावतीने अंबा सदन, रुक्मिणी नगर येथे प्रा.श्रीकृष्ण बनसोड, महिला आघाडीच्या कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. उज्ज्वला मेहरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बा. बुंदेले प्रा. एन.आर.होले,मधुकर आखरे, अनिल भगत,वसंतराव भडके स्वाती बनसोड यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ व महात्मा फुले- सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा सस्नेह भेट देवून दि.१३ जानेवारी २०२५ला सत्कार करण्यात आला.
सत्कारा प्रसंगी शिघ्रकवी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ” डॉ.सुजाता काळे ” या स्वरचित अभंगाचे गायन करून अभिनंदन केले.
सत्काराप्रसंगी प्रा.प्रदीप काळे, प्रवीण काळे, इंजि. ओजस काळे, रजनी अकर्ते, डॉ.मनिषा काळे, शुभांगी अंबाडकर, प्रतिभा भुयार, भारती प्र.काळे,विनोदिनी शेरेकर, मृणाल ओ.काळे,शृतिका शेरेकर, शरयू प्र.काळे,सोनल काळे, लीना प्र. काळे यांनी तसेच विविध संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा.डॉ.सुजाता काळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड अभिनंदन करताना म्हणाले की, “अर्थतज्ज्ञ प्रा.वा.सी.काळे व तत्कालिन ऑनररी मैजिस्टेट चंपावतीबाई काळे यांच्या सामाजिक कार्याचा व आदर्श विचाराचा वारसा डॉ.श्याम काळे, डॉ.मनिषा काळे ,डॉ.निशिकांत काळे, डॉ. सुजाता काळे हे यशस्वीपणे चालवित असून बहुजन समाजातील गुणवंत व प्रज्ञावंत विद‌यार्थ्यांना समाजसेवी कार्यासाठी प्रोत्साहित करण्याचे त्यांचे कार्य हे भूषणास्पद आहे .
“अमरावती विद्यापीठातील प्रा.सुजाता काळे यांचे परमाणु विभागातील कार्य अनमोल आहे .”असे विचार व्यक्त केले.
श्रीमती नलिनीताई पुरुषोत्तमजी पाटील (नागपूर) यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here