Home महाराष्ट्र गंगाखेड शहरात जागतिक पंचशील धम्मध्वज दिन साजरा

गंगाखेड शहरात जागतिक पंचशील धम्मध्वज दिन साजरा

103

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9जानेवारी):-भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा गंगाखेडच्या वतीने (दिनांक 8 जानेवारी बुधवार) रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जागतिक पंचशील धम्मध्वज दिन साजरा करण्यात आला

भारतिय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष पंडित पारवे,बार्टिचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांच्या हस्ते पंचशील व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.अशोक गायकवाड,लहू केदारे,जिजाराम संभाजी भालेराव यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वज व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष गोरखनाथ कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्रिशरण पंचशील बौध्दाचार्य सखाराम पंडित व बौध्दाचार्य रमेश जोंधळे यांच्या हस्ते उपस्थितांना देण्यात आले.

याप्रसंगी कृष्णा सावंत, रमेश सुर्यवंशी ,कुलदिप पारवे ,बाळासाहेब पारवे ,नाना लांडगे, डि.यस.प्रधान, नवनाथ खंदारे, श्रावण गायकवाड ,शिवाजी गायकवाड ,निवृत्ती गायकवाड ,दिलिप देवरे ,विश्वनाथ महादुळे आनंद साळवे यांच्यासह भारतीय बौध्द महासभेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here