Home महाराष्ट्र ग्रामगीता वितरण आणि मौन श्रद्धांजलीने गंगापूजनचा कार्यक्रम : मत्ते परिवाराचा स्तुत्य उपक्रम

ग्रामगीता वितरण आणि मौन श्रद्धांजलीने गंगापूजनचा कार्यक्रम : मत्ते परिवाराचा स्तुत्य उपक्रम

109

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.9जानेवारी):-साईनगर निवासी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक लटारुजी मत्ते यांच्या मातोश्री दिवं. आनंदाबाई उद्धवराव मत्ते यांच्या स्मरणार्थ मत्ते परिवाराचे वतीने गंगापूजनचा कार्यक्रम ग्रामगीता पध्दतीने घेण्यात आला.

यानिमित्ताने आयोजित ग्रामगीता प्रबोधनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस ॲड.राजेंद्र जेनेकर , ग्रामगीता परिक्षेचे गोंडपिंपरी तालुकाध्यक्ष सुभाष पावडे, ज्येष्ठ भजन प्रचारक बळीरामजी बोबडे , पांडुरंग वडस्कर चिंचोली(बुज),मनोहर बोबडे ,देवरावजी निब्रड यांची प्रमुख उपस्थिती उपस्थिती होती.

जवाहरनगर श्रीकृपा गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या सदस्यांनी राष्ट्रसंत लिखित भजने प्रस्तुत केली .श्रीगुरुदेव अधिष्ठान,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि आनंदाबाई मत्ते यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. यावेळी ॲड.राजेंद्र जेनेकर,सुभाष पावडे,मनोहर बोबडे,देवराव निब्रड यांनी समयोचित विचार व्यक्त करून आनंदाबाईच्या जीवनावर विचार व्यक्त केले. गंगापूजन निमित्ताने राष्ट्रसंत विचार दर्शन संदर्भात आयोजन केल्याबद्दल बंडोपंत बोढेकर यांनी मत्ते परिवाराचे कौतुक करून दिवं. आनंदाबाईना श्रध्दांजली अर्पण केली.

आयोजक सौ.संध्याताई मत्ते व लटारु मत्ते यांचे हस्ते उपस्थित नातेवाईक,आप्तेष्ट मित्रपरिवारांना ‘ग्रामगीता’ वितरीत करण्यात आल्या. उपस्थितांनी मौन पाळून आनंदाबाईंना श्रद्धांजली अर्पण केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल मत्ते यांनी केले. राष्ट्रवंदना गायनाने समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here