Home यवतमाळ उमरखेड नगरपरिषदने वाढविलेल्या कर निर्धारणावर ॲड बदनोरे यांचे कायदेशीर मार्गदर्शन

उमरखेड नगरपरिषदने वाढविलेल्या कर निर्धारणावर ॲड बदनोरे यांचे कायदेशीर मार्गदर्शन

306

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 16 जून) नगरपरिषदने भरमसाठ वाढविलेले कर हे कश्या प्रकारे बेकायदेशीर आहे या विषयावर आज 15 जुन रोजी शहरातील युनिव्हर्सल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आयोजित एका लिगल कार्यक्रमात प्रकाश टाकले याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन उपस्थित वकील मंडळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मंडळी व नागरिकांना केले उपस्थित व्यापारी वर्ग व नागरिकांनी कर आकारणी संबंधी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली दिनांक 19 ते 26 जुन दरम्यान होणाऱ्या सुनावणीची कायदेशीर तयारी कशाप्रकारे असायला हवी याबाबतीत सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले सुनावणी दरम्यान नागरिकांनी व्यापाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांनी इ. उपस्थित सहाय्यक संचालक रचना विभाग अधिकारी, मुख्याधिकारी यांना कायदेशीर कोणते प्रश्न विचारावेत याबाबत सविस्तर नियमावली तयार करून 1. कलम 119 प्रमाणे जी नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीस मधील बांधकामाचे प्रकार व उपयोन कोणत्या नियमाप्रमाणे तयार करण्यात आलेले आहे

2. कलम 120 च्या नोटीस मध्ये मालमत्ता कर जो 23% नमूद केलेला आहे तो कोणत्या नियमाचे आधारे निर्माण झालेला आहे.

3. नगरपरिषद ने कोणत्या एजन्सी मार्फत कर आकारणीचे काम केलेले आहे.

4. त्या कर आकारणी साठी किती पैसे किंवा रक्कम नगर परिषदेने आज पर्यंत अदा केलेली आहे.

5. नगरपरिषद तर्फे जी नोटीस कलम 120 नुसार वितरित केली जात आहे त्या नोटीस करित किती रुपये खर्च झाले

6. नगरपरिषद ने सन 2021-22 व 2022- 23 या वर्षामध्ये किती मालमत्तेला करा संबंधाने सवलत दिलेली आहे आणि किती रक्कम शासनाकडून त्याबाबत प्राप्त केलेली आहे

7 नगरपरिषद कर निर्धारण समिती पुढे सन 2017 सालाचे किती अपील न्यायप्रविष्ठ आहेत आणि इतके दिवस ते न्यायप्रविष्ठ राहण्याचे कारण काय?

8. नगरपरिषदेने ग्रामीण भागावर सन 2017-18 मध्ये जे कर मुल्यांकन केले किंवा कर आक केली ती नगरपरिषदेच्या कोणत्या तरतुदीप्रमाणे केलेली आहे.

9. 2017-18 मध्ये कर आकारणी करिता नगरपरिषदेने कोणत्या एजन्सीला नियुक्त केले हो आणि त्यासाठी किती रक्कम खर्च करण्यात आली

10. 2017-18 मध्ये कर आकारणी करण्यात आली होती त्या कर आकारणीबाबत जे मालमत धारकांनी अक्षेप सादर केले होते त्या सर्व अक्षेपाबाबतची नोंद असणारे रजिस्टर कलम 119

प्रमाणे ज्या नोंदी ठेवण्यात आलेल्या आहे त्या नोंदी उपलब्ध करून द्याव्यात.

11. मागील अपील समितीने नगरपरिषद काय‌द्याचे कलम 169 (2) (अ) प्रमाणे मालमत्तेचे पुनर्विलोकन केलेले आहे.

वरील प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असून त्याची उत्तरे नगर परिषद कडून मिळविणे आवश्यक आहे.
एक होणाऱ्या सुनावणीची पूर्ण तयारी करून दिली उपस्थित नागरिकांचे सुद्धा समाधान झाले .

या बेकायदेशीर करवाढी संदर्भात नागरिका मध्ये रोष आहे नेमकी हीच गरज समजून हे कायदेशीर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन ॲडवोकेट संतोष जैन साहेब, ईनायतउल्ला खान जनाब साहेब केले होते.

यावेळी शहरातील नागरिकांची फार मोठी उपस्थित दर्शविली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here