


✒️यवतमाळ(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.9मार्च):-जगात तसेच देशात एकिकडे आमचा कोवळ्या मुलीवर दुष्कर्म, बलात्कार तर या अत्याचाराचा विरोधात न्याय साठी जेफ्री एपस्टीन फाईल प्रकरणात भारतातील काही चेहरे समोर येऊन देखील दोषींविरुद्ध कार्यवाही झाली नाही.
दोषींविरुद्ध कार्यवाही झाली पाहीजे व त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ही मागणी करण्यासाठी काल जागतिक महिला दिनी यवतमाळ मध्ये रखरखत्या उन्हात काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत अनेक लहान लहान मुलींनी निषेध व्यक्त केला.
जेफ्री एपस्टीन फाईल प्रकरण न्याया साठी व दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे म्हणून निषेध रॅलीत निषेध दर्शवणारी प्रतिकात्मक तलवार हातात घेणारी योद्धा जिजाऊंनी लेक काश्यपी वि. दोंदल हिने प्रतिनिधित्व केले होते. दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे म्हणून निषेध रॅलीत सहभाग घेतला














