


बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
*पुसद प्रतिनिधी* -तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त, पुसद उमरखेड रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली
सोहळ्यानिमित्त निमित्ताने
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर परिसरातील धम्म बांधवांना महाभोजनदान देण्यात आले.
या सोहळ्याचे मुख्य आयोजन, मुनेश्वर हाटे, माधव हाटे, यादव हाटे भीमशक्तीचे संतोष आंबोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती,यावेळी
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शितलकुमार वानखेडे सर . अर्जुन भगत अध्यक्ष धम्मक्रांती प्रज्ञापर्व विठ्ठलराव खडसे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आबेडकर पुतळा सहनियंत्रन समिती . भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संतोष अंभोरे, नरेद्र पाटील सर, काँग्रेस कमेटी चे माजी तालुकाध्यक्ष शरद ढेंबरे , पॉल्टीकस स्पेशल प्रतिनिधी रहमान चव्हाण, रिपब्लिकन वार्ता न्यूजचे विदर्भ विभाग उपसंपादक राजेश ढोले, दैनिक अधिकार नामाचे पत्रकार कैलास श्रावणे, मोची समाज नेता तथा सुरज कुरिल, नटवर उटवाल भाजपा नेते ,बाबुराव पाईकराव ,यादव हाटे यांची विषेश उपस्तिथी होती . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शितल कुमार वानखेडे राज्य उपाध्यक्ष कास्टटाईब कर्मचारी संघटना याचे हस्ते बुद्ध मुर्तीची विधिवत पुजा करण्यात आली त्यानंतर उपस्थित सर्व नागररिकांनी त्रिशरण पचशिल तथा बुद्ध वंदना घेवून कार्यकमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव पाईकराव यांनी केले तर आभार यादव वानखेडे यांनी मानले मान्यवरांच्या हस्ते विधिवत पुजन झाल्यानंतर उपस्थित सर्व परिसरातील नागरिकांना भोजनदान देण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम बुद्ध विहार समिती, व महिला मंडळ आंबेडकर वार्ड पुसद यानी अथक परिश्रम घेतले.














