Home यवतमाळ मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात खपून घेणार नाही-विविध सामाजिक संघटनेचे राज्यपालाला निवेदन

मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात खपून घेणार नाही-विविध सामाजिक संघटनेचे राज्यपालाला निवेदन

180

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद:डॉ.बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण सहनियंत्रण समिती पुसद तथा भीम आर्मी यवतमाळ जिल्हा व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांनी एकाच वेळी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन देऊन निषेध तथा विरोध दर्शविला आहे. या निवेदनात लिहिले आहे की.जी मनुस्मृती विषमतावादी व विभाजनवादी सामाजिक व्यवस्था निर्माण करून केवळ हिंदू धर्मीयांनाच विभाजित करीत नसून ही मनुस्मृती माणसामाणसांत भेदभाव करते अश्या विषमतावादी आणि विभाजनवादी मनुस्मृती मधील श्लोकांचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’ यांनी ठेवला असल्याचे निदर्शनास आले आहे.जर असा कोणता प्रस्ताव असेल तर कोणत्याही प्रकारे मनुस्मृती सारख्या विषमतावादी आणि विभाजनवादी पुस्तकांतील श्लोकांचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये. आणि हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण सहनियंत्रण समिती पुसद व भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा यवतमाळ व भारतीय बौद्ध महासभा शाखा पुसद तालुका यांचे मार्फत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असे या निवेदनात स्पष्ट उल्लेख केलेला आहे या निवेदनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष विठ्ठल खडसे,सचिव लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष दिनेश खांडेकर, आंबादास वानखेडे दिनेश सावळे, नितेश खंदारे, विशाल पडघणे, भास्कर बनसोड, विशाल कांबळे, मुनेश्वर हाटे,भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, भारतीय बौद्ध महासभा पुसद तालुका अध्यक्ष भारत कांबळे, भोलानाथ कांबळे, ल. पु. कांबळे, भगवान खंदारे, विनोद कांबळे, तुकाराम चौरे, प्रल्हाद खडसे, बाळासाहेब ढोले, मिलिंद लोखंडे, सुरेन्द्र गावंडे, कृष्णा दांडेकर, इत्यादी तिन्ही समित्यातील पदाधिकाऱ्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here