


✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. १२ फेब्रुवारी) भारतीय युवा मोर्चा च्या माध्यमातून भारतातील ३१ राज्य ५५० जिल्ह्यात एकाच वेळी EVM मशीन च्या विरोधात राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहिम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या अंतर्गत उमरखेड तालुक्यात,
भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विद्वानभाऊ केवटे यांच्या नेतृत्वात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
EVM मशिन च्या विरोधात माननिय सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ ला “केवळ EVM चा वापर करून मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही”,असे जजमेंट दिलेले असताना निवडणूक आयोग EVM चा अट्टाहास धरीत आहे.यावरून आयोगाची भूमिका लोकशाही विरोधी वाटत आहे.
यामुळे आम्ही EVM विरोधात सांविधानिक मार्गाने मैदानात उतरलो आहोत. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या आंदोलनात फार मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वाक्षरी करून सहभाग दर्शविला.
यावेळी भारतीय युवा मोर्चा च्या समर्थनार्थ बहुजन मुक्ती पार्टी च्या वर्षाताई देवसरकर,छत्रपती क्रांती सेनेचे संतोष पाटील चंद्रवंशी,राजेश शिंदे,माजी आमदार विजयरावजी खडसे, भिमराव चंद्रवंशी,भारत मुक्ती मोर्चाचे मिलिंद चिकाटे,प्रकाश कांबळे,पुंजाराम हटकरे,दलीत मित्र किशोर भवरे,पु.युवा ब्रिगेड चे शाहरुख पठाण,काँग्रेस चे दत्तराव पाटील चंद्रवंशी, कृ.उ.बाजार समिती ढानकी चे सभापती बाळू पाटील चंद्रे, शिवसेनेचे उपाध्यक्ष सतीश नाईक, पत्रकार संघाचे डॉ.पठाण, तातेराव हणवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच रिपब्लिकन युवा सेनेचे सुनील पाटील चिंचोलकर, शुध्दोधन दिवेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर, भीम टायगर सेना जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे, सतीश कोल्हे, शेख निसार, मनसे चे शेख सादिक,राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे शेख जब्बार,जुनेद खान,अमिन भाई,दाऊद भाई, वंचित आघाडीचे देवानंद पाईकराव, यांसह मोठ्या संख्येने विविध सामाजिक संघटन आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी विद्वान केवटे यांच्या वतीने तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी, युवा, महिला, बेरोजगार, शेतकरी,शेतमजूर अश्या जवळपास २००० नागरिकांनी ह्या स्वाक्षरी अभियानात सहभागी घेतला.
यावेळी संचलन संजय बनसोडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा चे भूषण पठाडे,साहिल रोकडे,सुहास मूनेश्र्वर, संविधान धोंगडे, राजदीप बरडे,संदेश पठाडे, उज्वल लोणकर,शिवाजी चंद्रवंशी, राहुल गायकवाड,यश पडघने,रोहित कांबळे,कृष्णा चंद्रवंशी,दीपक चंद्रवंशी, बाजीराव गायकवाड, हर्षदीप बरडे,विशाल कांबळे, परमेश्वर मिरासे,रवी धुळे,अतुल केंद्रेकर,अतिश खिल्लारे,अरुण कानिंदे,राजू हणवते सयद मक्सुद,शुभम खंदारे,स्वाती लोणकर, आम्रपाली लोकरे, प्रेमाताई पाटिल,रमा कांबळे, कविता बरडे,गोदावरी केवटे, पुष्पाग पठाडे, धुरपता कुर्हे,बनुबाई केवटे, उमाबाई थोरात यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सदर अभियानाची एकच चर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होत होती.आणि EVM विरोधात नागरिकांनी प्रचंड संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करित ह्या स्वाक्षरी अभियानात सहभागी दर्शविला.














