Home महाराष्ट्र पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांची तालुका अध्यक्षपदी तर सचिवपदी वसंता नरवाडे यांची सर्वानुमते...

पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांची तालुका अध्यक्षपदी तर सचिवपदी वसंता नरवाडे यांची सर्वानुमते निवड उमरखेड तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघ पुन्हा नवीन कार्यकारणी गठीत

192

 

उमरखेड (दि. १२ फेब्रुवारी) युवा ग्रामीण पत्रकार संघटना विदर्भ मराठवाड्यात जोर धरत आहे.
निर्भीड, निपक्ष व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारावर हल्ले होत असल्यामुळे युवा ग्रामीण पत्रकार संघ अन्याय अत्याचार करणार्‍या विरुद्ध कठोर पावले उचलणार असे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गणेश कचकलवाड यांनी उमरखेड शासकीय विश्रामगृह येथे नवीन कार्यकारणी गठीत करतांना सांगितले.

पत्रकारिता करते वेळेस राजकीय, शासकीय, ठेकेदारांच्या अनेक कामाविरुद्ध पत्रकार स्थानिक स्तरावरून निर्भिड लेखनीच्या माध्यमातून पितळ उघडे करणाऱ्या बातम्या प्रकाशित करतो.

मात्र त्याचा द्वेष धरून पत्रकाराला मानसिक व पारिवारिक त्रास देऊन बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारावर भ्याड हल्ले केले जातात.

युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या कोणत्याही पत्रकारावर अन्याय अत्याचार झाल्यास महाराष्ट्रभर असलेली संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहून पत्रकारांना न्याय मिळवून देणार म्हणून उमरखेड येथील शहरासह ग्रामीण बंदीभागातील पत्रकारांनी युवा ग्रामीण पत्रकार संघात सामील करण्यात आले.

उमरखेड पत्रकार संघाच्या कार्यकारणीला स्वतः राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गणेश कचलवाड व जिल्हाध्यक्ष विजय सूर्यवंशी हे प्रामुख्याने उपस्तित होते.

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त सिद्धार्थ दिवेकर यांची अध्यक्षपदी अनुमती निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्षपदी राजूभाऊ पिटलेवाड, सचिवपदी वसंता नरवाडे तसेच सदस्य म्हणून उमेश पंडागळे, पिंटू हाके, सुहास खंदारे, बबलू भालेराव,अतिश वटाणे यांची निवड करून युवा ग्रामीण पत्रकार संघटना नवीन कार्यरणी गठीत करण्यात आली.

या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्थरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here