Home चंद्रपूर संस्कार आणि जीवनमूल्ये जपण्यासाठी सावित्रीबाई चा आदर्श महत्वाचा – प्रकाश मेश्राम (अध्यक्ष...

संस्कार आणि जीवनमूल्ये जपण्यासाठी सावित्रीबाई चा आदर्श महत्वाचा – प्रकाश मेश्राम (अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन)

267

 

चिमूर तालुक्यातील खापरी धर्मु येथे बौध्द पंच कमेटी चे वतीने ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला ,संस्कार हा सर्वात मोठा दागिना आहे तर आपण आयुष्यात आपल्या पाल्याकरिता संपत्ती पेक्षा संस्कार घडवा तेव्हा आदर्श पिढी निर्माण करू शकतो प्रस्तवी क करीत असताना मूकनायक फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रकाश मेश्राम बोलत होते ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रेया शेंडे सरपंच ग्रा प खापरी धार्मु,तर प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर प्रा डॉ नरेंद्र मेश्राम,अतिथी जनार्धन खोब्रागडे सर भारतीय बौध्द महासभा माजी अध्यक्ष नागपूर,अरविंद जी रामटेके से नि शिक्षक चिमूर ,पो पा अंजली मेश्राम, प्रा डॉ मिलमिले सर आठवले कॉले ज चिमूर , प्रा दिवाकर कुंभरे सर आठवले कॉलेज चिमूर , पिसे मैडम मुख्यद्यपिका जी प खापरी धर्मु , गभने मॅडम सहायक शिक्षिका जी प खापरी धरमु,से नी अंगणवाडी शिक्षिका मेश्राम मॅडम ग्रं प सदस्य रामटेके मॅडम उपस्थित होते मान्यवर पाहुण्यांनी सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर उजाळा टाकला पुढे प्रकाश मेश्राम यांनी स्री ही समाजाचा अलंकार आहे आणि स्त्रीचा सन्मान करणे ही प्रत्येक पुरुषाची जबाब दारी आहे प्रा नरेन मेश्राम सर यांनी उपभोगाची जननी नसून प्रथम महिला शिक्षिका आहे. आणि ती आपले कुटुंब उत्तम रित्या सांभाळू शकते ,तर अनिष्ट रूढी परंपरा यावर सडकून आपले मत प्रखर पणे मांडले तर अरविंद रामटेके सर यांनी स्त्री ही अबला नसून सबला आहे. “मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी,” यावर आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरवात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज dr बाबासाहेब आंबेडकर ,रमाई,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मेश्राम यांनी तर सूत्र संचालन व आभार सौ नीता प्रकाश मेश्राम यांनी केले, गावा तील दोनशे स्त्री पुरुष उपस्थित होते, कार्यक्रमाचा समारोप शाळेतील विद्यार्थ्यांना बुक व पेन वाटप करून करण्यात आला. तर कार्यक्रम यशस्वी करिता उपासक ,उपसिका यांनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here