Home यवतमाळ सम्यक बुद्ध विहार येथे रमामाता महिला मंडळाची नवीन कार्यकारणी गठीत (अध्यक्षापदी...

सम्यक बुद्ध विहार येथे रमामाता महिला मंडळाची नवीन कार्यकारणी गठीत (अध्यक्षापदी सौ. उषाताई इंगोले तर सचिव पदी सौ.कांचन दिवेकर, सौ.उज्वला धबाले, सौ.विद्या इंगोले यांची अविरोध निवड)

230

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 4 जानेवारी) भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी डॉ. आंबेडकर वार्डमधील सम्यक बुद्ध विहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

रमामाता महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा हिराबाई दिवेकर (नप माजी नगरसेविका, उमरखेड) यांच्या अध्यक्षखाली नवनिर्वाचित महिलांची निवड करण्यात आली.

या रमामाता महिला मंडळाचे नवीन कार्यकारणी मध्ये अध्यक्षापदी उषाताई संतोष इंगोले तर उपाध्यक्षा भारतीताई कुमार केंद्रेकर, सचिवपदी कांचन गौतम दिवेकर, उज्वला राजीव धबाले, विद्या दिगंबर इंगोले, संघटकपदी प्रज्ञा राजू दिवेकर, स्वाती सिद्धार्थ दिवेकर, सहसंघटकपदी मधुबाला अजय दिवेकर, माया सुनील पाईकराव, लता श्रीपती श्रवले, ज्योती दिलीप कांबळे, रिंकू नागोराव दिवेकर, दिपाली सुरज दिवेकर कार्याध्यक्षापदी भारताबाई अशोक दिवेकर, मिराबाई भिमराव दिवेकर, मनीषा भगवान दिवेकर, दिपाली विजय दिवेकर, रंजना अरुण आठवले, प्रज्ञा तुषार पाईकराव,राखी संदेश धबाले, मनीषा किरण दिवेकर, संघमित्रा संजय केंद्रेकर, सोनाली सतीश इंगोले, ज्योती भिमराव श्रवले,अनिता संजय पाईकराव तर सल्लागार म्हणून हिराबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, यशोदा दिवेकर, यशोधरा धबाले, शांताबाई दिवेकर, सिंधुबाई दिवेकर,सुभद्राबाई पाईकराव, आनंदाबाई दिवेकर, सुशिलाबाई शिवाजी पाईकराव लक्ष्मीबाई आठवले अशा प्रकारची नवनिर्वाचित रमामाता महिला मंडळाचे कार्यकारणी गठीत करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिराबाई दिवेकर यांनी नवनिर्वाचित महिला मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा दिल्यात.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीम टायगर सेना चे शहरअध्यक्ष तथा पत्रकार सिध्दार्थ दिवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक इंगोले यांनी मानले.

यावेळी सिद्धार्थ दिवेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष इंगोले, प्रफुल दिवेकर, तुषार पाईकराव, तानेज पाईकराव दीपक इंगोले यांच्यासह डॉ.आंबेडकर वार्डातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here