Home यवतमाळ ग्रामपंचायत पांढुर्णा बु. येथे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करा – भीम आर्मी

ग्रामपंचायत पांढुर्णा बु. येथे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करा – भीम आर्मी

243

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

पुसद (दि. 30 डिसेंबर) ग्रामपंचायत पांढुर्णा बु.तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील सरपंच द्वारका रामदास मस्के व ग्रामसेवक अविनाश चव्हाण यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी.

तसेच आपल्या पंचायत समिती पुसद कार्यक्षेत्रातील पांढुर्णा बु. तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील सरपंच द्वारका रामदास मस्के व ग्रामसेवक अविनाश चव्हाण यांनी विविध योजने मध्ये भ्रष्टाचार केला असुन त्या भ्रष्टाचारामुळे पांढुर्णा बु. हे गाव विकासापासून वंचित राहत आहे.
ज्या योजने मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याची यादी खाली दिलेली आहे.

या प्रकरणाशी संबधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.

असे निवेदन भीम आर्मी तर्फे गटविकास अधिकारी पुसद जिल्हा यवतमाळ यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here