Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचा आयुक्त कार्यालय शिक्षण पुणे येथे मोर्चा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचा आयुक्त कार्यालय शिक्षण पुणे येथे मोर्चा

234

 

 

चंद्रपूर- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचा आयुक्त कार्यालय शिक्षण पुणे येथे भव्य मोर्चा नवभारत साक्षरतासह शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे बंद करा.आम्हाला शिकवू द्या. या व इतर मागण्यांसाठी राज्याचे शिक्षण आयुक्त कार्यालयावर राज्यातील २४ शिक्षक संघटनांच्या राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, राज्य सरचिटणीस राजेश सुर्वे, राज्य प्रमुख संघटक प्रसाद पाटील व सर्व संघटनांचे राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य मोर्चात पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, राज्य संघटक पी आर पाटील, राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, अनिल उत्तरवार, प्रमिला माने यांचेसह सर्व जिल्हा शाखांचे जिल्हा नेते, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, सर्व जिल्हा पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून पुरोगामी शिलेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तसेच इतर सर्व घटक संघटनांचे सर्व जिल्ह्यातून संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होते. अशी माहिती जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर,जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, विद्या खटी महिला मंच अध्यक्ष,पौर्णिमा मेहरकुरे महिला मंच सरचिटणीस,लक्ष्मण खोब्रागडे यांनी कलविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here