


गंगाखेड :-
मुलभूत गरजांचा योग्य पुरवठा आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्यास चौफेर विकास होत असतो. त्यामुळे याकडे लक्ष देवून पाठपुरावा करणे आवश्यक असते. म्हणून राज्य व केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. कारण, रस्त्यांमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत तालुक्यातील राज्यमार्ग १६ ते सिरपूर रस्ता सुधारणा आणि २५९ ते सादगीरवाडी पुढे लांडकवाडी रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्या दोन्ही कामांसाठी ४ कोटी ३६ लाख १७ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.
राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी अशा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत हि कामे मंजूर झाल्याने दर्जेदार रस्ते तयार होतील. या रस्त्याच्या सुधारणेमुळे ग्रामीण दळणवळणास चालना मिळेल. तसेच लोकांच्या अडचणी कमी होण्यास मदत होईल, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले.
हे काम पूर्णत्वास गेल्यास परिसरातील अनेक गावांना दिलासा मिळेल. दळणवळण व पायाभूत सुविधा निर्माण करणे काळाची गरज आहे, हे ओळखून सातत्याने या कामासाठी पाठपुरावा केला होता. आज त्याचे भूमिपूजन करताना समाधान वाटले, हेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी रासपा प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप अळनुरे, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, गटविकास अधिकारी उदयसिंग शिसोदे, युवक तालुकाध्यक्ष भगवान सिरस्कर, सरपंच बालासाहेब ढोले, उपअभियंता बाचेवार साहेब, सरपंच भास्करराव लांडे, सरपंच मारोती माने, सरपंच अनिल आलापुरे, माजी सरपंच परसराम गुट्टे, उपसरपंच सुधाकर हनवते, नागनाथराव शेवटे, प्रा.सुधाकर शेवटे, गुत्तेदार प्रकाश चाटे, राहुल शिंदे, ग्रामसेवक राजकुमार हिंगे, नगरसेवक उबेदखान पठाण, असदभाई पठाण, माजी सभापती गणेशराव घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब एंगडे, विजयकुमार घोरपडे, चेअरमन प्रभाकर जाधव, युवक तालुकाध्यक्ष बालासाहेब लटपटे, धनंजय कदम, धारबा टाके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














