


सचिन सरतापे
म्हसवड : भारतीय बौध्द महासंभा शाखा माण तालुका नूतन कार्यकारणीची निवड गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हा अध्यक्ष (पूर्व ) श्रीमंत घोरपडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी तालुका अध्यक्षपदी अरविंद बनसोडे यांची तर सरचिटणीस पदी श्रीमंत भोसले व कोषाध्यक्षपदी बौध्दाचार्य बाळासाहेब सरतापे यांची निवड करण्यात आली.
अरविंद बनसोडे यांनी यापुर्वीही माण तालुका अध्यक्ष म्हणून दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला होता या काळात त्यांनी तालुक्यात धम्म चळवळ गती मान केली होती त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकारणीला बरोबर घेत तालुक्यात महिला शिबीर, बाल संस्कार शिबीर, समता सैनिक दलाचे शिबीर अशा प्रकारची शिबीरे राबवली होती त्याच बरोबर त्यांनी तालुक्यातून दहा बौद्धा चार्य आणि एक महिला केंद्रीय शिक्षिका तयार केल्या होत्या
यावेळी अरविंद बनसोडे म्हणाले कोरोना काळात तालुक्यात लोकडॉऊ न मुळे काम करता आले नाही परंतु आता मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून तालुक्यातील आजी माजी सदस्य आणि तालुक्यातील धम्म बांधवाना सोबत घेत धम्म चळवळ पूर्वीपेक्षा गतिमान करणार आहे
यावेळी जिल्हा सरचिटणीस अविनाश बारसिंग, कोषाध्यक्ष नंदकुमार शिंदे, संस्कार उपाध्यक्ष नानासो मोहिते, महिला उपाध्यक्ष सुजाता गायकवाड, जिल्हा एडिटर अरुण गायकवाड व जिल्हा संघटक दादा दाजी कांबळे यांचे उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया संपन्न झाली
यावेळी तालुक्यातून बौद्धा चार्य पिंटू बनसोडे, बौद्धा चार्य आबासाहेब बनसोडे, माजी तालुकाध्यक्ष सिधार्थ बनसोडे, शशी देठे, श्रीमंत भोसले, सुनिल भोसले, बौद्धा चार्य कुमार सरतापे,दादासाहेब भोसले, केंद्रीय शिक्षिका शोभाताई बनसोडे,संदीप खरात, वंचित तालुकाध्यक्ष युवराज भोसले,आदी धम्म बांधवाची उपस्थिती होती
जिल्हा अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणात शुभेच्छा देऊन तालुका शाखेला कामाचे टार्गेट ठरवून दिले यावेळी नूतन अध्यक्ष सरचिटणीस कोषाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.













