


सचिन सरतापे
म्हसवड/सातारा : दिनांक ८/११/२०२३ रोजी बहुजन शिक्षक संघाकडून नदाफ दाम्पत्यांकडून चालवले जाणाऱ्या अनाथ मुलांच्या जिजाऊ वसतिगृहातील सर्व ३५ मुलांस ड्रेस व लाडू चिवडा असा फराळ देणेत आला.सातारा जिल्हा बहुजन परिवार सदस्या नंदा लोखंडे यांनी अमेरिकेतून ४०००० /-चाळीस हजार रुपये जिल्हा सचिव महेश लोखंडे यांचे खातेवर पाठवले होते त्यांनी ४०००० /-चाळीस हजार रुपये रकमेचा चेक नदाफ या अनाथ मुलांच्या जिजाऊ वसतिगृहाच्या संचालक महोदयांकडे कराड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.सन्मती देशमानेसाहेब यांचेहस्ते देणेत आला. तसेच सर्व मुलांना ड्रेसचे वाटप करणेत आले.यावेळी कराड तालुक्याचे विस्तार अधिकारी जगतापसाहेब व विस्तारअधिकारी जमिला मुलाणी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष मा उदय भंडारे,जिल्हा सचिव महेश लोखंडे ,जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब खरात ,माजी तालुका अध्यक्ष सदानंद साबळे ,माजी तालुका अध्यक्ष राजाराम कारंडे ,तालुका सचिव संगीता वाघमारे ,तालुका महिला विभाग प्रमुख रुपाली काटे ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य नलिनी बैले,शारदा लोकरे ,सुनंदा पाटणकर ,कराड तालुका कार्यकारिणी सदस्य अजित वाघमारे ,संघटक संतोष रसाळ,प्रतीक्षा लोखंडे,छाया शिंदे,पुजा भंडारे ,ज्येष्ठ मार्गदर्शक पाटणकरसाहेब व डॉक्टरसाहेब व युवा क्षितिज काटे हे उपस्थित होते.
सर्व मुलांना लाडू चिवडा दिवाळी फराळ दिला व संगीता वाघमारे यांनी मुलांना फटाके दिले. छोट्या बाल गोपाळांची दिवाळी गोड करणेसाठी बहुजन शिक्षक परिवारातील १०० बंधूभगिनी यांनी DONATE ONE DRESS CAMPAIN सुरु केले व निधी गोळा करून मुलांना ड्रेस घेतले .या उपक्रमास सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्रातून देशातून व सातासमुद्रापार अमेरिकेतून मदत आली मदत करणाऱ्या सर्वांचे आम्ही बहुजन परीवारामार्फत शतशः ऋणी आहोत.आपणा सर्वांचे मुळे हा कार्यक्रम संपन्न झाला .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शाळा प्रवेश दिनाचे निमित्ताने व दिवाळी या देशातील सर्वात मोठ्या महोत्सवात मुलांना आनंद मिळावा यासाठी मुलांना वस्त्रदान व फराळ दान करणेत आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शाळा प्रवेश दिनाचे निमित्ताने हा कार्यक्रम बहुजन शिक्षक संघाकडून संपन्न झाला.













