Home यवतमाळ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मेश्राम यांची वंचिताच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड (निवड झाल्याबद्दल...

सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मेश्राम यांची वंचिताच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड (निवड झाल्याबद्दल मेश्राम यांच्यावर जिल्ह्यातून शुभेच्छा चा वर्षाव)

259

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

दारव्हा (दि. 12 नोव्हेंबर) यवतमाळ जिल्हा वंचित आघाडी (प.) च्या अध्यक्षपदी दारव्हा येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी त्यांची नेमणूक केली आहे.
असे दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी एका पत्राद्वारे कळविले आहे.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम हे यांनी पक्षाच्या विविध पदावर कार्य केले आहे.
या पूर्वीचे दारव्हा तालुका कार्याध्यक्ष तसेच यवतमाळ जिल्हा सचिव पदावर कार्य केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्य सर्वसामान्य लोकापर्यंत नेऊन पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

पक्षाची विचारधारा वंचितापर्यंत पोहचवून वंचितांना सत्तेचा मार्ग दाखविण्याची पक्षाची जी भूमिका आहे त्या दृष्टीने पक्ष महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे.

समाजातील विविध समाज घटकांना सोबत घेवून वाटचाल करणे व त्यांना सत्तेचा वाटा मिळवून देणे हे पक्षनेते अँड बाळासाहेब आंबेडकरांचे ध्येय आहे. त्या दिशेने जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्य राहणार आहे.

पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडेन असा विश्वास पांडुरंग मेश्राम यांची व्यक्त केला आहे.

आणि आपल्या निवडीचे श्रेय पक्षनेते अँड बाळासाहेब आंबेडकर प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांना दिले आहे.

त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात पक्ष कार्यकार्त्यामध्ये जोश निर्माण झाला असून जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here