Home यवतमाळ अज्ञातांनी एसटी बस पेटवून फरार-बस मधील 73 प्रवासी सुखरूप

अज्ञातांनी एसटी बस पेटवून फरार-बस मधील 73 प्रवासी सुखरूप

206

 

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)
मो.9823995466

उमरखेड :- (दि. 28 ऑक्टोबर) तालुक्यातील उमरखेड हदगाव गोजेगाव नजीकच्या विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा पैनगंगा नदीच्या पुलावर अज्ञात लोकांनी महामंडळाची एसटी बस पेटवून दिली तेथून पसार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री 11:45 वाजताच्या सुमारास घडली.

या बसमधील 73 प्रवासी सुखरूप आहे. नांदेड आगाराची नांदेड- नागपूर बस रात्री 11:45 वाजता पैनगंगा पुलाजवळ पोहोचताच मोटारसायकल स्वाराने ही बस थांबवली.

त्यामागून आलेल्या पाच ते सहा लोक आले. तोपर्यंत बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले होते.
या अज्ञात लोकांनी पेट्रोल टाकून बस पेटवून दिली.
या घटनेत एमएच 20 जीसी 3189 या क्रमांकाच्या बसचे 32
लाख रुपयांचे नुकसान झाले.
बस जाळनारे कोण होते, त्यांनी हा प्रकार का केला.
याचा शोध उमरखेड पोलिस करीत आहे.

या बसवर चालक बी. डी. नाईकवाडे, तर वाहक एस. एन. वाघमारे हे होते. घटनास्थळी यवतमाळ आणि नांदेड एसटी विभाग नियंत्रकांनी व इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here