


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
यवतमाळ (दि. 28 ऑक्टोंबर) स्थानिक सुराणा लेआउट परिसरात असलेल्या, लोक सोयीच्या खुल्या जागेवर ग्रीन ओपन जिम लावण्यात आले.
या ओपन जिमचे उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते उमेश मेश्राम यांच्या अथक प्रयत्नातून, त्यांच्याच नावाने तीन ओपन जिम पारित करून त्यापैकी एक, सुराणा लेआउट परिसरात असलेल्या, लोक सोयीच्या खुल्या जागेवर , परिसरातील समस्त जनतेला शरीर सुदृढ ठेवण्याकरिता ग्रीन ओपन जिम लावण्यात आले.
आज या ओपन जिमचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत उमेश मेश्राम, निवृत्त पोलीस अधिकारी आनंद भगत, राष्ट्रीय खेळाडू भाकीत मेश्राम, रितेश मुन, विजय धुळे, रोहित मेश्राम, सुराणा लेआउट परिसरातील ज्येष्ठ नागरिक गजानन अघम, अवधूत बनसोड, शेख बशीर शेख, आकाश डोंगरे, सचिन गुल्हाने, मंदाबाई नांदणे, मालाताई अघम, हिना शेख, इंदिरा धूर्वे, चंदाबाई श्रीवास, आकाश बनकर, अरुण बोरकर, करण अलोणे, आकाश घुटके, स्वप्निल थुल, अजय वासनिक, रवी वासनिक, अनील महाजन, आकाश बिसेन, राकेश ताराचंद घोडेकर, रमेश नांदणे, माला इंगळे, रौनक सोनकर, आकाश गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, गोदावरी पाटील इत्यादी खेळाडू व परिसरातील ज्येष्ठ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुराणा लेआउट परिसरात असलेल्या, लोक सोयीच्या खुल्या जागेवर ग्रीन ओपन जिम तेथील जनतेला शरीर सुदृढता ठेवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने उपयोगात आल्याच्या चर्चा परिसरात केल्या जात होत्या. मान्यवरांच्या हस्ते व्यायामाच्या साहित्याचे पूजन करून उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.














