Home यवतमाळ मराठा आरक्षणाला शिवभिम फाउंडेशन चा जाहीर पाठिंबा

मराठा आरक्षणाला शिवभिम फाउंडेशन चा जाहीर पाठिंबा

146

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.9 सप्टेंबर) उमरखेड तहसील कार्यालय येथे 5 सप्टेंबर पासून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आमरण उपोषण सुरू झाले आहे.
सचिन घाडगे,गोपाल कलाने, सुदर्शन जाधव, शिवाजी पवार,शरद मगर यानी या आमरण उपोषणास सुरवात केली आहे.

जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्येत हे आमरण उपोषण संविधानिक मार्गाने सुरू राहील अशी आदो लकांची भूमिका आहे. आमरण उपोषणास विविध सामजिक संघटना,राजकीय पक्ष,तसेच आजू बाजूच्या विविध खेड्यान मधून पाठिंबा मिळत आहे.

शहरातील सामजिक काम करणाऱ्या शिवभिम फाउंडेशन यांनी आज उपोषण स्थळी जाऊन आदोलकांची भेट घेत आंदोलकांना शिवभिम फाउंडेशन च्या वतीने जाहीर पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवभिम फाउंडेशन चे अध्यक्ष निशांत मनवर, सदस्य नितीन शिंदे, शुभम माने, सुनील लोखंडे, बाळासाहेब चंद्रवंशी , ज्ञानेश्वर लोखंडे आदी उपस्थित होते.

आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बांधवांतर्फे सरकारची ची प्रेत यात्रा कडण्यात आली.

या वेळी आदोलकानी सरकार चा निषेध केला व महाराष्ट्र सरकार यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा समाजा ला आरक्षण मिळून द्यावे अशी मागणी करण्यात आली.

या वेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते.
चौकट : निर्णय घेण्यासाठी कोणती अडचण ? एका रात्रीत निर्णय घेऊन पहाटे शपथविधी होतो.

केंद्र शासनाला इतर निर्णय त्वरित घेता येतात. मग मराठा आरक्षण देण्यासाठी कोणती अडचण निर्माण होत आहे. असा खोचक प्रश्न मंडपातील मराठा बांधवांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here