


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.9 सप्टेंबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे संजीवक कै. डॉ. आत्मारामजी गावंडे यांची जयंती कृतज्ञता दिन (थॅंक्स गिव्हिंग डे) म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
शनिवार (दि. ९) रोजी गावंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक, इनरव्हील क्लब व रोटरी क्लब, उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.
दंत चिकित्सा शिबिरात १५० विद्यार्थ्यांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांनी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले. दंत चिकित्सा शिबिरासाठी डॉ. प्रेषित मुक्कावार यांचे सहकार्य लाभले.
गावंडे महाविद्यालयाच्या परिसरात भव्य अतिथीगृह आहे. नुकतेच या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण करण्यात आलेल्या या अतिथीगृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत व संस्थेचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी रोटे. प्रवीण दारदाजी, रोटे. प्रो. अशोक कोठारी, रोटरी क्लब, उमरखेडचे अध्यक्ष डॉ. डी. डी. व्यवहारे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष धामणकर मॅडम व सर्व रोटेरियन पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. आत्माराम गावंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. रोटेरियन प्रो. अशोक कोठारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत यांच्या शुभहस्ते लेक्चर रेकॉर्डिंग स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले.
या स्टुडिओची उभारणी गावंडे महाविद्यालयातील अध्ययन व अध्यापन केंद्राचे समन्वयक डॉ. ब्रिजू थंकाचन, अमेरिका यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य डॉ. व्ही. पी. कदम, डॉ. डी. व्ही. तायडे, प्रा. एस. बी. वाघमारे, डॉ. एस. आर. वद्राबादे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. एम. गुजर, पर्यवेक्षक प्रा. बी. यु. लाभसेटवार, अधीक्षक साहेबराव कांबळे, गजानन देवसरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. अर्चना मिटके, प्रा. एस. एस. इंगळे, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन प्रा. एस. एस. पाचकूडके, प्रा. डॉ. पी.डी. वंजारे, प्रो. डॉ. टी. एम. भगत, प्रा. अभय जोशी, प्रा. डॉ. एस. एम. चेडे, प्रा. डॉ. के. एस. सोनटक्के, प्रा.पी के नखाते, प्रा.आय. वाय. खान, प्रा. संतोष तावडे, प्रा. एस. पी. चिंचोळकर व व्ही. एस. नलावडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.














