Home महाराष्ट्र ज्योती मेटे यांचे नाव आणि एकाच दगडात अनेक पक्षी!

ज्योती मेटे यांचे नाव आणि एकाच दगडात अनेक पक्षी!

155

▪️ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

ज्योती मेटे jyoti mete या मराठा maratha समाजासाठी काम करणाऱ्या आमदार विनायक मेटे vinayak mete यांच्या पत्नी असून दिवंगत विनायक मेटे यांचे निधन झाल्यानंतर त्या राजकारणात दुर्लक्षित झाल्या होत्या. भाजप bjp आणि अजित पवारांच्या ajit pawar राष्ट्रवादीत NCP राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाच्या माध्यमातून डोईझड होणाऱ्या महिला बऱ्याच आहेत असा फडणवीस यांना ज्ञात आहे. 

त्यामुळे ज्योती आणि मेटे यांना पुढे आणून त्यांना बळ देण्याचे घाटत आहे. ज्योती मेटे यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद देऊन एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे योजना देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणात दिसून येते. ज्योती मेटे या मराठा फेस आहेत. आणि दुर्लक्षित आहेत अशा परिस्थितीत त्यांना बूस्टर डोस दिला तर त्या भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्या निष्ठावान होऊ शकतात आणि त्यातून देवेंद्र फडणवीस यांच्ययांच्या बद्दल मराठा समाजामध्ये असलेले निगेटिव्ह भावना दूर होण्यास मदत होईल. 

राज्य महिला आयोगाच्या mahila ayog अध्यक्षपदाच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंग साधायची संधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद हे अजित पवार गटाकडे आहे. भाजपने हे पद घेतले तर अजित पवार गटाची नाराजगी ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांना हे पद दिले तर त्या भाजपच्या सक्रिय कार्यकर्ता नाही आहेत. त्यामुळे हे पद भाजपने घेतलं असं त्यांच्या युतीतील मित्र पक्षांना वाटणार नाही. त्याचबरोबर मराठा समाज खुश होईल. ज्योती मेटे यांना पुढे आणून भविष्यकाळात भाजपमध्ये घेतले जाईल आणि भाजपमध्ये अनेक डोईजड होऊ पाहणाऱ्या नेत्यांना बाजूला सारले जाईल ही देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची नीती आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा सुरू करण्यात आली आहे.

आपणास काय वाटतं श्रीमती ज्योती मेटे यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर बघायला आवडेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here