Home महाराष्ट्र रुपाली चाकणकर यांना माजी नगरसेवक योगेश ससाणे, पुणे यांचा पाठिंबा !!

रुपाली चाकणकर यांना माजी नगरसेवक योगेश ससाणे, पुणे यांचा पाठिंबा !!

143

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी,)मो:-९७६८४२५७५७

मी योगेश दत्तात्रय ससाणे माजी नगरसेवक पुणे मनपा जाहीर निषेध व्यक्त करतो की, कॅप्टन खरात प्रकरणात महीला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर यांचा हाकनाक बळी घेतला जातोय !! 

जर या प्रकरणी देशाचे ग्रुहमंत्री अमित शाह, राज्याच्या मुख्यमंत्री श्री फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, मंत्री श्री सुनील तटकरे, मंत्री श्री दिपक केसरकर, मंत्री श्री विखे पाटील, मंत्री श्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंतराव पाटील, खासदार श्री निलेश लंके, खासदार श्री श्रीकांत शिंदे इत्यादी …… तसेच डझनभर मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी इत्यादी चे फोटो प्रसिद्ध झाले असतील तर मात्र एकट्या चाकणकरांवर च एवढी आगपाखड कशासाठी ?? 

काही असंतुष्ट महीला पदाधिकारी त्यांच्या पदाच्या खुर्चीवर डोळाठेऊन पातळी सोडून टिका करताना दिसत आहेत!! 

        जर चाकणकरांचा राजीनामा घेतला गेला असेल तर ?? माझा प्रश्न आहे की, ज्याच्या ज्यांच्या समवेत त्या हरामखोराचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत त्यांना सुध्दा आपआपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागेल आणि नैतिकतेने त्यांनी तो दिला पाहिजे.

       चाकणकरांना टार्गेट करण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या ओबीसी समाजातील आहेत !

          चाकणकरांना टार्गेट करून समस्त ओबीसी- माळी समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही सर्व समाजाबांधव म्हणुन रुपाली ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here