


✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
जसं खगोलशास्त्र जीवशास्त्र तसंच अंकशास्त्र हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अंकशास्त्र हा एक अनादी काळापासून चालत आलेला मनुष्याच्या जीवनाशी निगडित असलेला विषय आहे. त्याचं आकर्षण जगाच्या पाठीवरील प्रत्येकाला असतंच. त्याच्यावरती काही अभ्यासक लोकांनी मोठी मोठी पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी खरच अंकशास्त्राचा मनुष्याच्या जीवनावर काय प्रभाव पडतो हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बऱ्याचदा असं आढळून येतं की मनुष्याच्या जीवनात चांगले वाईट घटना घडतात त्या विशिष्ट वेळेला विशिष्ट तारखेला आणि विशिष्ट वर्षात घडतात.
अजित पवारांचा मृत्यू झाला त्यावेळी ही या घटनेची अनेक अंकशास्त्रज्ञांकडून रिसर्च केला गेला. मग त्यानंतर कोइन्सिडेंटली अजितदादांचे वय महिने आणि दिवस या गोष्टी समान आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. गेल्या वर्षी मे महिन्यात गुजरात मधील अहमदाबाद येथे विंग कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता त्यावरही अंकशास्त्रज्ञांकडून रिसर्च करण्यात आला. त्यामधील प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांचा रिसर्च करण्यात आला. त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री ही समाविष्ट होते. इंदिरा गांधींचा मृत्यू राजीव गांधींचा मृत्यू त्यानंतर संजय गांधी यांचा मृत्यू यावरही अंकशास्त्रज्ञांकडून रिसर्च करण्यात आला होता असं म्हटलं जातं. किंबहुना संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर स्वतः इंदिरा गांधी या रशियाच्या एका प्रचंड अभ्यास असलेल्या अंकशास्त्रज्ञांचा सल्लामसलत घेत असल्याचे म्हटले जाते. परंतु त्यावरून काही ठोस निष्कर्ष काढता आला नाही. परंतु त्यावरून काही ठोस अनुदान लावता आले नाही परंतु काही तारखा जुळल्या होत्या असं म्हटलं जातं.
त्यावेळी माणसाचा अंकशास्त्रावरचा विश्वास वाढत जातो. अंकशास्त्र एक महत्त्वाचा विषय आहे हे खरं आहे. पण तो कायम प्रॅक्टिस करण्याचा विषय राहिलेला आहे. अजून तरी त्याच्यावर कुठलेही ठोकताळे बांधता येत नाहीत. अंकशास्त्राच्या अभ्यासाकांनी अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या आयुष्याचा अभ्यास केल्याचं म्हटलं जातं. इव्हन जर्मनीचा तत्कालीन हुकुमशहा हिटलर याचाही अंकशास्त्रावर विश्वास होता असं म्हटलं जातं. अमेरिकेची ट्वीन टॉवर ही इमारत पाडून जगाला धक्का देणाऱ्या ओसामा बिन लादेनचा अंकशास्त्रावर फार विश्वास होता. तो बरेचशे निर्णय घेताना तारीख आणि वेळ नोटीस करायचा ही गोष्ट त्याचे निकटवर्ती सांगतात.
भारताचे असे अनेक पावरफुल नेते होऊन गेले ज्यांचा अंकशास्त्रावर फार विश्वास होता. आणि त्यातून त्यांना यश मिळाल्याचे सांगण्यात येतं. अगदी इंदिरा गांधी सुद्धा अंकशास्त्रावर विश्वास ठेवायच्या असं म्हटलं जातं. असो तो एक मनुष्य स्वभावाचा पार्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज कुठलंही हॉस्पिटलचं उद्घाटन असो..त्या उद्घाटनाची वेळ तारीख संबंधित डॉक्टर अंकशास्त्रानुसार ठरवत असतात मग ही समाजाची बांधिलकी नसते तर मनात सुरक्षिततेची भावना असते. अशी असुरक्षिततेची भावना अपर क्लास, लोअर क्लास, मिडल क्लास सर्वच क्लास मधल्या लोकांमध्ये दिसून येते.
त्याला कारण म्हणजे माणसाच्या आयुष्यात काही घटना घडतात त्या फारच धक्कादायक असतात. अनाकलनीय असतात. कधी कधी एखादी घटना घडल्यानंतर माणसाला आठवतं की ही घटना एक वर्षापूर्वी जशीच्या तशी आपण आपल्या मनात चित्रपटासारखी पाहिली होती. त्यामुळे अंकशास्त्राला किंवा ज्योतिषशास्त्राला बळ मिळतं. अंकशास्त्र ज्योतिष शास्त्र हे एक स्वतंत्र सायन्स आहे हे नाकारता येत नाही. पण त्यावरून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल ठोस असे अनुमान लावता येत नाही हेही तितकेच खरे आहे.
अशा काही घटना घडल्यानंतर अनेक राजकीय नेते अंकशास्त्र ज्योतिष शास्त्र यावर विश्वास ठेवतात. त्यानुसार आपलं पुढचं कामकाज ठरवतात अगदी निवडणुकीचा फॉर्म भरण्यापासून तर सर्व महत्त्वपूर्ण कामे अंकशास्त्रानुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार केली जातात. असं काही नाही की अंकशास्त्र मानणारे लोक विशिष्ट विचारधारेचे असतात. स्वतःला नास्तिक समजणारे लोकही आतून प्रचंड अस्तित असतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दलही बरंच काही ऐकलं आहे. महाराष्ट्रातील अनेक आमदार खासदार किंवा पावरफुल नेते यांचा अंकशास्त्रावर प्रचंड विश्वास असल्याचे दिसून येते
भारतरत्न सचिन तेंडुलकर काही वर्षांपूर्वी सत्य साईबाबा नामक बाबांकडे जायचे. त्यांची अशी श्रद्धा होती की सत्य साईबाबांमुळेच मला क्रिकेटमध्ये यश मिळत आहे. अभिनेता गोविंदा काही वर्षांपूर्वी अशाच भोंदू बाबांच्या कह्यात अडकला होता. एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉपचा नायक म्हणून गणला जाणारा गोविंदा नंतर भोंदूगिरीमध्ये अडकला.
गंडेदोरे, अंगठ्या मुहुर्त या गोष्टींमुळे त्याला त्याने साइन केलेल्या अनेक फिल्म अर्ध्यावर सोडाव्या लागल्या आणि नंतर निर्माते आणि दिग्दर्शक आणि गोविंदाकडे पाठ फिरवली आणि आज त्याला गल्लीबोळात नाचावे लागत आहे. अभिनेता विनोद खन्ना हि कुठल्यातरी भोंदू बाबाच्या नादी लागून आपल्या करिअरची बरबादी करून बसला.
आणि आजच्या काळात फॉर्म ला आलेला खरात बाबाची भक्तांची यादी पाहिली तर अचंबित व्हायला होते. आज सकाळीच मला खराब बाबाच्या गावातून एका व्यक्तीने फोन केला होता. त्या व्यक्तीने घरात बाबा बद्दल अनेक अनाकलनीय गोष्टी मला सांगितल्या. त्याने सांगितले की घरात बाबाकडे मंत्रिमंडळातील अनेक मंत्री प्रोटोकॉल तोडून येत होते. आणि सल्ला घेत होते. अनेक सेलिब्रिटी खराब बाबांचा आशीर्वाद घेत होते. अनेक हायप्रोफाईल लोकांच्या बायका खरात बाबांच्या चरणावर डोके ठेवत होत्या. चित्रपट, राजकारण, बिझनेस, क्रिकेट अशा अस्थिर असलेल्या क्षेत्रातील लोकांच्या असहाय्यतेचा खरात बाबाने फायदा उचलला. ज्यांना मुलगा होत नाही अशा महिलांच्या भावनांचाही खरात बाबांनी फायदा घेतला. त्याची स्वतःची स्पर्म बँक होती असेही म्हटलं जात आहे. खरात बाबांनी काय काय कांड केले हे आता समोर येत आहे.
एवढ्या प्रसिद्धीच्या झोतात राहणारे गर्भ श्रीमंत लोक कुठल्यातरी बुवाबाच्या नादाला लागतात ही गोष्ट अनाकलनीय आहे. सचिन तेंडुलकर हा ही फार अंधश्रद्धाळू व्यक्ति आहे असेही ऐकण्यात आले आहे.














