Home Breaking News आमदार चषक खटावची ओळख क्रिकेट जगतात करणार_महेश घाडगे(पिंटु)

आमदार चषक खटावची ओळख क्रिकेट जगतात करणार_महेश घाडगे(पिंटु)

289

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.22ऑक्टोबर):-जिल्ह्यातील खटाव मध्ये आमदार चषक गेले अनेक वर्षापासून खटाव मध्ये भरवत असून या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला खटावची नवीन ओळख निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व आमदार महेश शिंदे यांची बंधुतुल्य सहकारी महेश घाडगे(पिंटू)यांनी व्यक्त केले.

              यावेळी रुपेश घाडगे, रमेश कोळी ,अक्षय जगताप ,अक्षय जाधव, अमित जाधव, बंटी बागवान,दीपक घाडगे,तानाजी घाडगे,संजय शिर्के, उपस्थित होते.

           अनेक वर्ष सातत्याने खटाव मधील इंदिरानगर येथील मित्र सहकार समूहातील मित्रांनि आमदार महेश शिंदे यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान व यांच्या नेतृत्वाखाली व रुपेश घाडगे यांच्या सहकार्याने आमदार चषक क्रिकेट चालू केले असून याची आता राज्यभर व्याप्ती वाढत आहे. प्रथम बक्षीस 51 हजार,30हजार,15 हजार10हजार अशी अनुक्रमे बक्षीस आहेत. तर या चषकासाठी मर्यादित 16 संघांचा समावेश करणार असून सामने 29 ऑक्टोबरला पहिला सामना होणार असून दोन नोव्हेंबर ला अंतिम सामना होणार असून महाराष्ट्रातील क्रिकेट शौकिनांनी रुपेश घाडगे 9860091418 यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन महेश घाडगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here