


नाशिक- शांतारामभाऊ दुनबळे
नाशिक-: आदिवासी समाज (S.T.) प्रवर्गात इतर समाज घटकांचा समावेश करू नये. ह्या प्रमुख मागणी साठी आदिवासी शक्ती सेना वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटीइयर लागू केले आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदी नुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. त्या नंतर याच हैदराबाद गॅझेटियर मध्ये धनगर, बंजारा आणि वंजारी आदिवासी आणि मागासलेले आहे त्यामुळे त्यांचा अनुसूचित जमाती एसटी समावेश करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
त्यामुळे भविष्यात असे होऊ नये व आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याकरिता आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आदिवासी समाजाच्या हितासाठी आदिवासी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी पालखेड, दावचवाडी, नांदुर्डी, रेडगाव, वावी, शिरवाडे पाचोरा, ओझर, जानोरी मोहाडी, पिंपळगाव बसवंत तसेच इतर ठिकाणचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सकल आदिवासी समाजाच्या वतीने जिल्ह्याधिकारी यांना मूळ आदिवासी समाज(ST) प्रवर्गात इतर समाज घटकांचा समावेश करू नये तसेच सकल आदिवासी हे महाराष्ट्रातील मूळ आदिवासी मूळनिवासी आहोत. आदिवासी बांधवांना (ST) कॅटेगरी article 341 भारतीय संविधानाने कायदेशीररित्या आरक्षण संविधानात्मक मार्गाने दिलेले आहे. असे असताना सध्याच्या परिस्थितीत काही इतर समाज घटक बेकायदेशीररित्या (ST) प्रवर्गात इतर समाजाचा समावेश करावा यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत.
भारतीय घटनेने मूळ आदिवासी बांधवांना दिलेले आरक्षण हे संविधानात्मक मार्गाने दिलेले असल्याने इतर कोणत्याही प्रवर्गात मूळ (ST) प्रवर्गात आरक्षणात अंतर्भाव करण्यात येऊ नये तसेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यास आपण या निवेदनाद्वारे सूचित करावे की अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर रित्या जीआर इतर समाजाचा आदिवासी समाजात अंतर्भाव करण्याचा पारित करण्यात येऊ नये ही सकल आदिवासी बांधवांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी राजू माळी, पुंजाराम माळी, अनिल मोरे, शिवाजी पवार, रवींद्र मुकणे, समाधान मोरे, दीपक सोनवणे, अमोल भागवत, कैलास सूर्यवंशी, अरुण कोकाटे, विष्णू सूर्यवंशी, गणेश मोरे, समाधान बड़े, भगवान कोकाटे, नवनाथ दिवे, राहुल कराटे, रवींद्र कोकाटे,गोविंद कराटे, अजय दिवे, संदेश कराटे, दीपक कोकाटे, विनायक कोकाटे, राहुल कुऱ्हाडे, आकाश माळेकर, सागर दिवे, कृष्णा कडाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, धर्मेंद्र गांगुर्डे, दिगंबर कोकाटे, तुषार दिवे, मधुकर कोकाटे, आबाजी गांगुर्डे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळेस आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सांगण्यात आले जर आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर सकल आदिवासी समाज हा गप्प बसणार नाही आदिवासी समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे आदिवासी समाजावर कुणीही अन्याय करू नये तो अन्याय सहन करून घेणार नाही सर्व आदिवासी समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.















