


नाशिक -शांतारामभाऊ दुनबळे
बुद्धिस्ट ग्रामसेवक संघाच्या माध्यमातून येवला मुक्तीभूमी येथे भव्य धम्मध्वज उभारण्यात येणार!
नाशिक-: महाबोधी महाविहार,महू जन्मभूमी, दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन राष्ट्रीय आंदोलन राहिले नसून जगातील बौद्ध धर्मीय राष्ट्र ह्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जागतिक पातळीवर बौद्ध धर्मियांच्या अस्मितचा विषय असून बौद्ध धर्म व भारतीय संविधान या वरील आक्रमण, संविधानिक मूल्य-विचारांची मोडतोड हि जगातील मानवतावादी राष्ट्र व लोक चळवळी नाकारत असून धम्म व संविधान संवर्धनासाठी समता सैनिक दल बळकट अधिक व्यापक करावे असे मत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ट्रस्टी ऍड. एस. के. भंडारे यांनी व्यक्त केले.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेच्या वतीने ऐतिहासिक मुक्ती भूमी येथे नाशिक जिल्हा पश्चिम विभाग समता सैनिक दल उजळणी व पदोन्नती शिबिर नुकतेच येथे संपन्न झाले त्यावेळी ऍड. एस. के.भंडारे बोलत होते.
प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पपूजा करून अभिवादन व त्रिशरण पंचशील देण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे डी. एम. आचार्य, बी. एच. गायकवाड, साहित्यिक देवेंद्र उबाळे, शरद भोगे, गौरव पवार, मोहन जमधडे, नाशिक जिल्हा पश्चिम विभाग अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, संडे धम्म स्कुलचे प्रमुख प्रा.शरद शेजवळ, दिपक गरुड, सुरेखाताई लोखंडे हे उपस्थित होते.
मुक्तीभूमी मैदानात बुद्धिस्ट ग्रामसेवक संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष मोहन जमधाडे, संघटक ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब आहिरे बुद्धिस्ट ग्रामसेवक संघाच्या माध्यमातून येवला मुक्तीभूमी येथे भव्य धम्मध्वज उभारण्यात येत असून हा ध्वज पंधरा बाय बावीस फूट अशी लांबी रुंदी असणार आहे, तर उंची छप्पन फूट आहे. ह्या ध्वजाच्या कामाचे भूमीपूजन ऍड.भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.
समता सैनिक दलाचे प्रशिक्षण व संचलन हिरामण आहिरे, गौतम दादा कर्डक, सखाहरी गरुड यांनी घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष दीपक गरुड, प्रवीण खळे, भीमराव वाघ, भिकचंद पगारे, रवींद्र सोनवणे, पंचम साळवे,रामा केदारे, अमोल पगारे, विजय गायकवाड, मच्छीन्द्र झालटे, भाऊसाहेब झालटे, अमोल सोनवणे, अमोल गायकवाड, श्रावण गरुड यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद भोगे तर आभार भाऊसाहेब जाधव यांनी मानले. येवला तालुका, नाशिक जिल्ह्यातील समता सैनिक दल सैनिक व बौद्ध धम्म उपासक, उपशिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.














