Home महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी मराठा मावळा संघटना आक्रमक-जिल्हाधिकारी कचेरीवर शोले स्टाइल आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मराठा मावळा संघटना आक्रमक-जिल्हाधिकारी कचेरीवर शोले स्टाइल आंदोलन

165

 

छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. महसूल आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकान्यांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर त्यांना इमारतीवरून खाली उतरविले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा आरक्षणाची मागणी करीत काही युवक गुरुवारी दुपारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढले आणि त्यांनी छतावरून खाली उड्या मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पोलिसांनी यांची समजूत घातली आणि त्यांना खाली उतरविले,
गच्चीच्या संरक्षक भिंतीवर बसून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, गुणरत्न सदावर्तेचे करायचे काय? खाली मुंडक वर पाय’, आदी घोषणा देण्यास सुरुवात केली.

• अचानक सुरू झालेल्या या शोले स्टाइल आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली होती. काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान तेथे पोहोचले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चा करण्यासाठी येण्याची विनंती केली. आंदोलकांना पकडण्याचा प्रयत्न केला तर आंदोलक इमारतीवरून उड्या मारतील, असा इशारा दिला. यामुळे आंदोलन ३ तास सुरू होते. यानंतर आंदोलकानी चर्चेची तयारी दर्शवीत आंदोलन स्थगित केले तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कालपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू झाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी मराठा मावळा संघटनेचे पेंढरीनाथ, गोडसे भरत कदम उदयराज गायकवाड, विशाल आहेर, दीपक नारळे हे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या छतावर चढून बसले. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त संपत शिंदे, एसीपी मसूद खान यांच्यासह सिटी चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी हे फौजफाट्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here