


अनिल साळवे, प्रतिनिधी
गंगाखेड(प्रतिनिधी )
शहरातील गौतमनगर येथे 28 ऑक्टोबर शनिवार रोजी सम्राट अशोक विजयादशमी व 67 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने नागपूर येथील प्रसिद्ध प्रबोधनकार मनोज राजा गोसावी यांच्या भीम संगीत रजनी सोहळ्याचे आयोजन सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आह़े या कार्यक्रमास बौद्ध उपासक, उपासिका यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.भीम संगीत रजनी सोहळ्यास मा. नगरसेवक राजकुमार सावंत,मा.नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे,सामाजिक कार्यकर्ते इंतेसार सिद्धीकी,सुमित कामत,मा.नगरसेवक विशाल साळवे,प्रमोद मस्के,प्राचार्य संजय सावंत, संघमित्र गायकवाड,रामराव साळवे,प्रकाश हातागळे,लखन साळवे,उत्तम रोहिणीकर,राम साळवे,सिताराम गायकवाड,सुनील मस्के,यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.67 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम होणारअसल्यामुळे भीम संगीत सोहळा यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब पाचंगे, बाबासाहेब मुंडे,बाबुराव गायकवाड,बालासाहेब साळवे, अविनाश जगतकर,प्रा.जयपाल पंडित, अँड.विजय साळवे सत्वशील साळवे,गोटू साळवे, गौतम गायकवाड,प्रकाश साळवे, सचिन जोंधळे,अलंकार डाके,दयानंद भालेराव,नितीन डाके,संघर्ष पंडित,प्रितेश पोळे, विजय साळवे,केतन कांबळे, नागेश भालेराव,सचिन हातागळे, बालाजी साबळे,सचिन डाके, बाळू साळवे इत्यादी परिश्रम घेत आहेत.














