


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड: – (दि. 26 ऑक्टोंबर)
शहरातील तसेच परिसरातील नागरिकांचा समावेश असलेल्या ‘आरोप प्रत्यारोप’ या व्हॉट्स ॲप गृपवर झालेल्या अश्लिल चॅटींग वरुन आरोपीने लोखंडी रॉडने मारल्याची तक्रार गृप अडमिन मनोज रुडे यांनी उमरखेड पोस्टेला दिल्यावरून पोलिसांनी आरोपी सुनिल शहाणे यांच्या विरुद्ध भादंवि 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे .
सदर घटना दि 24 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3:30 वाजताचे दरम्यान घडली आहे.
“‘आरोप प्रत्यारोप”‘ या व्हॉट्स ॲप गृपवर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचे पदाधिकारी व फिर्यादी यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत होते.
त्यामध्ये फिर्यादीने केलेल्या अश्लिल शब्दातील चॅटींगमुळे आरोपीने मोबाईलवरून जाब विचारला असता फिर्यादीने गॅस एजन्सीजवळ येण्याचे फोनवर म्हटले त्यावर आरोपी तेथे पोहचला असता दि. 24 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3:30 वाजताचे दरम्यान त्यांच्यामध्ये शाब्दीक चकमक होऊन हाणामारीत रुपांतर झाले.
यामध्ये फिर्यादी मनोज रुडे हा गंभीर जखमी झाला.आरोपी सुनिल शहाणे यांनी डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याची तक्रार दिल्यावरून पोलीसांनी प्राणघातक हल्ल्याची नोंद घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाचा तपास एपीआय भरत चापाईतकर करीत आहेत.
चौकट:- दोघांच्याही परस्परांविरुद्ध तक्रारी या प्रकरणातील आरोपी सुनिल शहाणे यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार गृप अडमिन मनोज रुडे यांनी आरोप प्रत्यारोप या व्हाटस् अॅप गृपवर संघर्ष समितीचे पदाधिकारी व माझे नाव घेऊन आई व पत्नी बद्दल अपशब्द वापरले व त्यांनीच मला गॅस एजन्सीजवळ येण्यास सांगीतले व माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सदर तक्रारीबाबत सविस्तर चौकशी सुरु असल्याचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी म्हटले आहे.














