Home महाराष्ट्र वंचीतचा विधानभावनावर धडक मोर्चा ; माण तालुक्यातील गायरान जमीनधारकाना सामील होण्याचे युवराज...

वंचीतचा विधानभावनावर धडक मोर्चा ; माण तालुक्यातील गायरान जमीनधारकाना सामील होण्याचे युवराज भोसले यांनी केले आवाहन

180

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.16जुलै):- 20 जुलै 2023 रोजी वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात गायरान जमीनधारक शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी विधानभवन मुंबई येथे धडक मोर्चाचे आयोजन केले असल्याचे माण तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष युवराज भोसले यांनी सांगितले.यावेळी युवराज भोसले यांनी सांगितले कि माण तालुक्यातील ज्या गावात गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण करून राहण्यासाठी घरे बांधली असतील ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करून जागा धरल्या असतील अशा सर्व अतिक्रमण धारकांना विनंती आहे.

आपले नाव, पत्ता,मोबाईल नंबर,गट नंबर,अतिक्रमण क्षेत्र किती धरले आहे. याची माहिती वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब यांचे कडे पाठवायचे आहे.तरी दोन दिवसात आपली माहिती पाठवून द्यावी व त्याबाबत २० जुलै रोजी मुंबई येथे मंत्रालयावरती मोर्चाचे नियोजन केले आहे.बाळासाहेब आंबेडकर या जागा नियमित करून नावावर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी याचा फायदा अतिक्रमणधारकांनी घ्यावा व मोठ्या संख्येने विधानभावनावर होणाऱ्या मोर्चा मध्ये सामिल होण्याचे आवाहन युवराज भोसले यांनी केले

तरी माण तालुक्यातील गायरान जमीनधारकांनी आपले गावातील वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आपली माहिती द्यावी त्यांच्याशी संपर्क साधूनखालील पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी माण तालुका सल्लागार बाळासाहेब रणपिसे 9850371106 , वंचित बहुजन आघाडी माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले 7721968355 , वंचित बहुजन आघाडी माण तालुका सरचिटणीस बजरंग वाघमारे 7798119142 , वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष संतोष पारसे 8766492017 या नंबर वरती संपर्क साधून किंवा व्हाट्सअप वरती पूर्ण माहिती सेंड द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here