Home महाराष्ट्र महिलांचा भारतीय आयुर्विमा रोजगार क्षेत्रात उदंड प्रतिसाद-सहा तालुक्यात लावले पुजा कुरंजेकर यांनी...

महिलांचा भारतीय आयुर्विमा रोजगार क्षेत्रात उदंड प्रतिसाद-सहा तालुक्यात लावले पुजा कुरंजेकर यांनी विमा अभिकर्ता भरती शिबिर

145

✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)

साकोली(दि.16जुलै):- भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत साकोली शाखेतर्फे (सी. एल.आय.ए) अभिकर्ता पुजा नरेश कुरंजेकर यांनी साकोली शाखेअंतर्गत येणाऱ्या सहा तहसीलमध्ये साकोली, लाखनी, मोरगाव अर्जुनी, सडक/अर्जुनी, देवरी, लाखांदूर येथे दि. १३ जुलै पासून ग्रामीण भागात जीवन विमा अभिकर्ता भरती शिबिर घेणे सुरू केले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिला जे सुशिक्षित आहे अशा महिलांचे शिक्षण वाया जाऊ नये त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी करता यावे. तसेच शिक्षण शिकुन महिला फक्त घरापुरते मर्यादित राहू नये. त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त व्हावे.

जे महिला कुठलेही काम न करता स्वतःचा संसार चालविण्यासाठी चूल आणि मूल या दोन गोष्टीशी अवलंबुन आहेत त्यांना बाहेर निघून दोन पैसे कमविण्याची सवय लागावी व घरकुटूंब चालविण्यासाठी त्यांचा स्वतःचा परिवार चालविण्यासाठी हातभार लागावा या दृष्टीकोनातूनच त्यांनी विमा क्षेत्र निवडावे. याकरिता खास करून जीवन विमा अभिकर्ता भरती शिबीर धेण्यात येत आहे. महिलांनी जीवन विमा एजन्सी घेऊन भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन विमा एजन्सीचे काम केल्यास आपल्याला दोन पैसे हातात येईल व हे काम सुशिक्षित महिला घरसंसार सांभाळून देखील करू शकतात.
आज महिला प्रत्येक क्षेत्रात समोर गेल्या आहेत. महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहेत.

त्याचे प्रमुख कारण महिलांना सर्वच क्षेत्रात आरक्षण मिळत आहे यामुळे महिला पुरूषाच्या तुलनेत समोर जात आहे. आज एस टी बस मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना देखील सवलत म्हणून अर्ध्या तिकीटवर प्रवास करायला मिळत आहे. राजकारणात देखील महिलांना बरेच प्राधान्य दिले जात आहे. तसेच नोकरी मध्ये काम करणाऱ्या महिलांना देखील प्रत्येक क्षेत्रात आरक्षण दिले जात आहे. परंतु आजही बऱ्याच महिला सुशिक्षित असून घर कामाव्यतिरिक्त कोणतेच काम करायला तयार नाही अशा महिलांनसाठी आपल्या पायावर कसे उभे राहता येईल याची सुवर्ण संधी जीवन विमा अभिकर्ता भरती शिबीरच्या माध्यमातून चालून आली आहे.

सुशिक्षित महिला आज शिक्षण घेऊन घर कामाव्यतिरिक्त काहीच काम करीत नसेल तर त्यांच्या शिक्षणाला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे सुशिक्षीत महिलांना शिक्षणाचा पुरेपूर उपयोग घेता यावा याकरिता काहीतरी काम करणे आवश्यक झाले आहे. विमा क्षेत्र असे क्षेत्र आहे की, ज्या मध्ये सुशिक्षीत महिला आपला घरसंसार सांभाळून व जीवन विमा एजन्सी चे काम करून या दोन्ही कामात समन्वय साधून आपले काम योग्य प्रकारे करू शकतात. त्यामुळे खास करून महिलांनी यामध्ये पुढाकार घेऊन विमा क्षेत्रात काम करावे व स्वतः विमा योजनाचा लाभ घ्यावा आणि जीवन विमा एजन्सी घेऊन ग्रामीण भागातील लोकांना याचा लाभ दयावा असे आवाहन भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखेतील (सी. एल. आय. ए) अभिकर्ता पुजा नरेश कुरंजेकर यांनी सर्व सुशिक्षीत महिलांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here