Home महाराष्ट्र वऱ्हाड विकास सत्यशोधकीय विचारांचा साक्षीदार -प्रा.अरुण बुंदेले

वऱ्हाड विकास सत्यशोधकीय विचारांचा साक्षीदार -प्रा.अरुण बुंदेले

129

🔸वऱ्हाड विकासच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारप्रचाराचे कार्य अनुकरणीय- इंजि. राजेंद्र आंडे

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.16जुलै):-स्थानिक वऱ्हाड विकास मासिकाचा 37 वा वर्धापन दिन सोहळा महात्मा फुले बँकेच्या सभागृहात दि.15 जुलै 2023 ला संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष इंजि . राजेंद्र आंडे,प्रमुख अतिथी वऱ्हाड विकासचे संपादक प्रा.श्रीकृष्ण बनसोड, बँकेचे उपाध्यक्ष श्री दिलीपपंत लोखंडे,अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष, कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान ) इंजि.अविनाश राजगुरे होते .

अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा फुले,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,संत नामदेव महाराज,संत सावता महाराज यांना हारार्पन व पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचा ओनामा अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ” वऱ्हाड विकास ” या स्वरचित अभंगाचे सुमधूर आवाजात गायन करून सर्वांना मंगमुग्ध केले.अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी वऱ्हाड विकासच्या वर्धापन दिनाच्या विशेषांकाचे विमोचन केले.

अध्यक्षीय भाषणातून इंजि. राजेंद्र आडे यांनी ” वऱ्हाड विकासचे फुले -शाह – आंबेडकरांच्या विचार प्रचाराचे कार्य अनुकरणीय असून वऱ्हाड विकासने समाजप्रबोधनासोबत कौटुंबिक व सामाजिक समस्या, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या,बेरोजगारांची बेकारी, वाढती महागाई इत्यादी भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश ज्योत टाकण्याचा प्रयत्न केला”. असे विचार व्यक्त केले.

“_वऱ्हाड विकास नवोदितांचे_ _हक्काचे विचारपीठ “_
_-प्रा श्रीकृष्ण बनसोड_

वऱ्हाड विकासाचे संपादक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी स्वागतपर प्रास्ताविक भाषणातून” वऱ्हाड विकासने गेल्या 36 वर्षापासून समाजप्रबोधनासोबत वाचन संस्कृती समृद्ध केल्याचे सांगून नवोदितांना हक्काचे विचारपीठ मिळवून दिल्याचे सांगितले. “

” वऱ्हाड विकास सत्यशोधकीय_ _विचारांचा साक्षीदार “_
. _प्रा.अरुण बुंदेले_

प्रमुख अतिथी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ” वऱ्हाड विकास हा सत्यशोधकीय विचारांचा समर्थ साक्षीदार असून वऱ्हाड विकासने समाजप्रबोधनासोबतच समाज परिवर्तनाचे कार्य केले असून सत्यशोधकीय समाज जागृतीचे विचारपत्र वऱ्हाड विकास असल्याचे सांगितले.”

_” विधायक दिशा देणारा_
_वऱ्हाड विकास “_
_- मा.दिलीप लोखंडे_

प्रमुख अतिथी श्री दिलीप लोखंडे यांनी ” वऱ्हाड विकासने सामाजिक परिवर्तनाला गतिशील केल्याचे सांगून वऱ्हाड विकासचे विविध सामाजिक उपक्रम हे विधायक दिशा देणारे असल्याचे म्हटले. “याप्रसंगी सर्वश्री हेमंत बेलोकार,अँड.आशीष लांडे,राजू उर्फ मनोज भेले , श्री टी.एफ. दहिवाडे ,प्रा.एन.आर.होले, रामकुमार खैरे,वसंतराव भडके, मधुकर आखरे, अँड.प्रभाकर वानखडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.डॉ. सौ.उज्ज्वला ताई मेहेरे (माळोदे ) तर आभार प्रदर्शन महिला आघाडीच्या अध्यक्षा अस्मिता संजय घाटोळ यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले बँकेचे पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मौलिक सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here