


✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि. 11 मार्च):- वृक्ष संवर्धनाचे अविरत निस्वार्थ कार्य करणाऱ्या औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार समितीला काही दिवसापूर्वीच जाहीर झाला होता.
औदुंबर नगरीत सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवून वृक्ष लावगड व संवर्धनाचे कार्य उमरखेड येथील औदुंबर वृक्ष संवर्धन समिती औदुंबर वासीयांच्या सहकार्याने करीत आहे त्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन 2018 /19 चा सेवाभावी संस्था या गटातून विभागीय स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार(द्वितीय)जाहीर केला होता त्याचे वितरण आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी यवतमाळ येथील वनभवन येथे मा.श्री वसंत घुले (भा.व.से) वनसंरक्षक(प्रा), यवतमाळ वनवृत्त यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व 30000 रू. चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र औदुंबर वृक्ष संवर्धन समितीला देऊन गौरविण्यात आले.
मा.श्री धनंजय वायभासे (भा. व.से.) उपवनसंरक्षक (प्रा) यवतमाळ वनविभाग यांच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे सर्व अधिकारी औदुंबर समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार हा औदुंबर वृक्ष संवर्धन समितीला मिळालेला नसून सर्व उमरखेड वासियांना तसेच समितीला नेहमी तन-मन धनाने सहकार्य करणाऱ्या बाहेरगावी राहणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान असून या पुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याने समिती सातत्यपूर्ण वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य करीत राहील समितीला आतापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार दिलीप भंडारे अध्यक्ष तथा सर्व सदस्य गणऔदुंबर वृक्ष संवर्धन समिती उमरखेड













