Home महाराष्ट्र मोर्शी वरूड तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करा — आमदार देवेंद्र...

मोर्शी वरूड तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करा — आमदार देवेंद्र भुयार

293

🔹मदत पुनर्वसन विभागाकडे तत्काळ प्रस्ताव सादर करून अनुदान वाटप करण्याची शासनाकडे मागणी !

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.11मार्च):-विधानसभा मतदार संघातील मोर्शी वरुड तालुक्यातील घोराड, ढगा, आमपेंड, बेसखेडा, पोरगव्हाण, वेढापुर, आमनेर, एकांबा, बाभुळखेडा, देऊतवाडा,उदापुर, खानापुर, पवनी, मोरचंद, चिंचरगव्हाण, वाठोडा, चांदस, सुरळी, कुरळी व सावंगी या भागात दिनांक ६ व ७ मार्च, २०२३ च्या रात्री १२ ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत अवकाळी वादळी वा-यासह पाऊस झालेला आहे. सदर झालेल्या वादळी वा-यासह पावसामुळे शेतक-यांचे गहू, हरबरा, संत्रा व मोसंबी इत्यादी शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून यामध्ये मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत आलेला आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरूड तालुक्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे गहू, हरबरा, संत्रा व मोसंबी इत्यादी शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी संबंधितांना निर्देश देवुन झालेल्या शेतीपिकांचे नुसानीचा अहवाल शासनाकडे तात्काळ अहवाल सादर करण्यात येवुन नुकसान ग्रस्त शेतक-यांना तातडीने अनुदान वाटप करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्या !
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वरूड मोर्शी तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतींचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत. त्याचप्रमाणे कोणीही आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे — आमदार देवेंद्र भुयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here