Home महाराष्ट्र महाराष्टभूषण कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची जयंती नक्षञ काव्यमैफलने उत्साहात संपन्न

महाराष्टभूषण कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची जयंती नक्षञ काव्यमैफलने उत्साहात संपन्न

211

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.11मार्च):- नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे ३९ वतीने महाराष्टभूषण कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जयंतीनिमित्त नक्षञ काव्यमैफल घेण्यात आली.नक्षञाचं देणं काव्यमंचवर मनापासुन प्रेम होते. पहिले अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलन २०१० -पि. चि. मध्ये भरलेल्या महा काव्यसंमेलनाचे महा काव्यसंमेलनाध्यक्ष होते. त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा. यासाठी नक्षञ काव्यमैफल चे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या निवडक कवितांचे उपस्थितांनी काव्यसादर केले. बालकविता, सामाजिक, प्रेम, निसर्ग, पाऊस, जीवन इ. अनेक विषयांना स्पर्श करणा-या बहारदार रचनांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा.शंकर घोरपडे होते. यावेळी कवी वादळकार, कवी बबन चव्हाण, कवयिञी योगिता कोठेकर, कवी प्रा.दिलीप गोरे, मुख्याध्यापक बाळासाहेब आल्हाट, गीतकार देवेंद्र गावंडे, कवी रामदास हिंगे, कवी आनंद मुळुक, कवी अशोक वाघमारे इ. मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या काव्यरचना सादर करुन काव्यमैफल रंगविली.

कार्यक्रम अध्यक्ष प्रा.शंकर घोरपडे म्हणाले, “तरल मनाचे, मानवी जीवनमूल्य जपणारे महाकवी मंगेश पाडगावकर होते. जातीभेदाला छेदून माणसाला माणूस मानणारे थोर कवी होते. नक्षञांशी माझे अनेक जन्मोंजन्मीचे नाते असल्याचा त्यांनी नेहमी उल्लेख केलेला आहे. नव्याने कविता लिहिणा-यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अनेक पिढ्यांना त्यांच्या कवितांची भुरळ पडलेली आहे. नव्या पिढीने कवी मंगेश पाडगांवकर यांच्या कविता व त्यांच्या साहित्याचे वाचन करावे. पाडगांवकर हे महाराष्टाचे भूषण आहे. ते कधीही स्मृतीतून जाणार नाही.सदैव आपल्या सोबत स्मरणात आहेत.”

हा कार्यक्रम भोसरी सहल केंद्र (कवी कट्टा), भोसरी, पुणे येथे सांय ४ ते ६ या वेळेत संपन्न झाला.

उपस्थित कविंनी कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची एक रचना आणि आपली स्वत:ची एक रचना सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे संस्थापक राष्टीय अध्यक्ष नक्षञाचं देणं काव्यमंच यांनी उत्तमरित्या केले. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी या कवी कट्ट्यावर भेटण्याचा संकल्प करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here