


इतिहास पुस्तकात लिहीला आहे. तो अनेक लोकांनी स्वतंत्र दिशेने लिहीला आहे. हत्ती जसा दिसला तसे वर्णन केले आहे. आपण त्यातून फक्त दाखले घेऊ शकतो. खरे खोटे लिहीणारा जाणतो. असेही आता ब्राह्मणांनी लिहीलेला इतिहास मराठे आणि ओबीसी, दलित खरा मानत नाहीत. पण वर्तमान खरे आहे ते मी पाहातो. तेच खरे मानतो.
आता हेच तथाकथित मराठे शिंदे आणि पवार आज रोजी फडणवीस चे मांडलिक बनलेले आहेत. यात गर्व करणार कि कमीपणा?
फडणवीस एक ब्राह्मण माणूस, अल्पसंख्यांक. त्यांनी दोन मराठ्यांना पाहिजे तसे वळवले आहे. दारूचे पैसे देऊन गुवाहाटी पळवले आहे. हे मराठे कितीही मिशा पिळोत पण कैची मात्र फडणवीस यांच्या हातात आहे. पाहिजे तेंव्हा छाटू शकतो. याबद्दल मराठ्यांना का कमीपणा वाटत नाही? पण इतिहासातील वांगी भाजून खाणारे मेंदूचा वापर करू शकत नाहीत. मेंदूत जागा तर पाहिजे. तेथून दारू मटणाचा वास येत आहे.
मराठ्यांच्या पुढील पिढ्या म्हणतील, फडणवीस यांनी कट कारस्थान करून, दगाबाजी करून मराठा सरदारांना पायाशी लोळण घ्यायला लावली होती. नाहीतर आमचे मराठे खूप शूर आणि स्वाभिमानी होते.
पण या वेळी तर मराठे खूप बुद्धिमान आणि काही तर भयंकर शूर आहेत. तरीही हे ब्राह्मणाचे दास्यत्व का स्विकारले? काय कारण आहे?
मुळातच मराठे हे राज्य करणारी जमात नाही. छत्रपती मराठे नव्हते.ते क्षत्रिय होते. सिसोदिया. त्यांचा पुतळा ठेवून मराठे स्वताला छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणून घेतात. तितकेच समाधान.
म्हणे ब्राह्मणांनी मराठ्यांना, ओबीसींना, दलितांना, आदिवासींना अशिक्षित ठेवले. आजही यातील अनेक माणसे शिक्षित तर आहेत. उच्चशिक्षित आहेत. तरीपण त्यांचे नेते अडाणचोट आहेत. याचे शल्य उच्चशिक्षित मराठ्यांना का खटकत नाही?
अजित पवारांनी ७२ हजार कोटीचा अपहार २०१२ पर्यंत केला होता. याच रकमेतून अनेक धरणे, कालवे बांधले असते तर शेतीला फायदा झाला असता. ती शेती फडणवीस ची होती कि शिवराम पाटील ची होती? अजित पवारांनी इतका अपहार केला तरीही मराठा का आडवा आला नाही? फडणवीस का बोलले? विजय पांढरे का बोलले? कारण भ्रष्टाचार करणे मराठ्यांचा मोठेपणा मानला जातो. आजही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मला प्रामाणिक वाटत नाही. सब गोलमाल है.
माझ्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सात्री गावांचे पुनर्वसन करण्यासाठी ८० कोटी रुपये खर्च करून नवीन जमीन घेतली. नागरी सोयीसुविधा बांधकाम केले. ३०/५/२०२२ ला जळगावचे कलेक्टर धरणग्रस्त लोकांना प्लॉट वाटप करणार होते. पण याच लोकांचा तथाकथित मराठा, कुणबी मराठा आमदार अनिल भाईदास पाटील याने कलेक्टरला २७/५/२०२२ ला तीन दिवस आधी पत्र देऊन प्लॉट वाटप थांबवले. कलेक्टर त्या तुकाराम मुंढे सारखा असता किंवा माझ्या सारखा असता तर दोन थोबाडीत ठेवली असती. चोर तो चोर वरून शिरजोर. पण येथे कलेक्टर कमजोर पडला.सत्तेचा गैरफायदा घेऊन आमदार अनिल पाटील स्वताचा अनधिकृत फायदा करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.नंतर हाच आमदार पुनर्वसन मंत्री बनला.दोन वर्षे.याच हरामखोराने पुनर्वसन तर केलेच नाही उलट पुनर्वसन विरोधात पंटर करवी स्टे आणला.सरकारी वकिल मार्फत न्यायाधीशाला दहा लाख दिले.याला मराठा म्हणावे काय?
आताचा पुनर्वसन मंत्री सुद्धा मराठा आहे म्हणे. मकरंद पाटील. असतील ही मराठे. मी संशय घेत नाही. पण यांनी आतापर्यंत दोन वर्षे मंत्री असूनही पुनर्वसन केले नाही. उलट याच मकरंद पाटील यांचा सहसचिव राजेश बागडे याने लांच घेऊन कलेक्टरला वाटस अप वर पत्र दिले कि, पुनर्वसन थांबवा. कलेक्टर ची काहीतरी कमजोरी असू शकते.
ही सर्व हकिकत मी कलेक्टर, सचिव, मकरंद पाटील यांना सांगितली. तरीही ते मराठा मंत्री मकरंद पाटील हूं कि चूं नाही. मला प्रश्न पडतो, मराठा आमदार आणि मंत्री असे निर्दयी का वागतात? फक्त अजित पवार नव्हे, हे पण त्याच जातकुळी चे वाटतात.
आमदार अनिल पाटील ने पुनर्वसन ला विरोध केला. निचपणा आहे. तरीही मराठे म्हणून मिरवायचे का?हेच पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील जर पुनर्वसन करू पाहात असतील तर कोणी अडवले? फडणवीस ने कि मोदीने?पण ती सेवाभावी वृत्ती, प्रवृत्ती असावी लागते.मराठ्यांमधे नाही.ब्राम्हणाला दोष देऊन समाधान मानतात.
इतिहास बाबत कोणाला खात्री असेल त्यांनी इतिहासात कलगीतुरा करावा. मी नाही करीत. मला वर्तमान दिसते. ते शंभर टक्के खरे आहे.येथे मराठे शंभर टक्के चुकीचे काम करीत आहेत आणि दोष इतरांना देत आहेत.
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२















