


✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
मुंबई(दि.7जून):-दिल्लीतील जंतरमंतर येथे लाखो तरुण रस्त्यावर आंदोलन ठिणगी पेटवत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शहरप्रमुख श्री.उदय अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने जनतेवर लादलेल्या महागाईच्या भस्मासुरा विरोधात विरार शहरातील शिवसैनिक व महिला आघाडीच्या वतीने विरार रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी पालघर जिल्हाप्रमुख श्री.प्रथमेश राऊत व जिल्हा सचिव श्री.आनंद चोरगे यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले तसेच महिला शहरसंघटक सौ.शिलाताई लष्करे, उपशहरसंघटक सौ.रोशनी जाधव, जयश्री चव्हाण विभागसंघटक सौ.प्राजक्ता जांभळे, सुनीता सोनजे, साक्षी जाधव, रजनी कोठावळे व महिला आघाडीने रस्त्यावर चूल मांडून तसेच ऍड.गिरीश दिवाणजी, शहर कार्यालय प्रमुख श्री.सुनील चव्हाण, उपशहरसमन्वयक श्री.रमेश गुरव, सचिव श्री.राहुल धुरी, उपशहरप्रमुख श्री.जितेंद्र खाडे, विभाग प्रमुख श्री.अजय पिंपळे, शाखाप्रमुख श्री.दिनेश आदवडे, शिवराम तळेकर यांनी Melody चॉकलेट वाटत व चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध नोंदवला….
बाळासाहेबांचे शिवसैनिक श्री.महेश दीक्षित, शिव आरोग्य सेनेचे श्री.रोहित देव, शिव वाहतुक सेनेचे श्री.रवींद्र वाळुंज, शहर समन्वयक श्री.प्रदीप साने, उपशहरप्रमुख श्री.विनायक सकपाळ, शशी कदम, तुकाराम भुवड, विभागप्रमुख श्री.गणेश धावडे, सुनील कुटवड, अल्पसंख्याक विभागप्रमुख श्री.रहिस शेख, शाखाप्रमुख प्रितम रावराणे, चंद्रकांत सावंत, दिनेश आदवडे, जीवराज कोकितकर, विनायक पाटील, अल्पसंख्यक शाखाप्रमुख श्री.अल्ताफ अन्सारी, शाखासंघटक सौ.सुनीता मुळे, मीनाक्षी कदम, प्रिया मांडवकर, उपशाखाप्रमुख श्री.भावेश बाईत, उपशाखासंघटक सौ.मंगल गायकवाड, पूनम दुंडे, युवासेनेचे उपशहरअधिकारी श्री.रोहित कदम, विभागाधिकारी श्री.अरविंद दामुस्टे, मंगेश हातानकर आदी शिवसैनिकांनी उपस्थित राहून महागाई बद्दल झोपेचा सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केला.















