Home चंद्रपूर रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका!- शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशनतर्फे आयोजन

रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका!- शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशनतर्फे आयोजन

121

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.4जून):-शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय आणि मातृसेवा फाउंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका! या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

          कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो – सेल्फी नेहमीच काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो – सेल्फी काढून पाठवायचा. तुम्ही पाठविलेला सेल्फी राज्यस्तरावर प्रसिद्ध केला जाईल. ही नवी भन्नाट आणि अभिनव कल्पना लढवून लोकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभं करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.‌       

        सेल्फी किंवा फोटो ९६२३२३७१३५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा. ही स्पर्धा नि:शुल्क असून सर्वांसाठी खुली आहे. सेल्फी किंवा फोटो सोबत संपूर्ण नाव, वय, संपूर्ण पत्ता, कोणते झाड लावले? त्याचे नाव, इ माहिती पण पाठवावी.

        पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत असलेलं तापमान, कमी होणारं पर्जन्यमान, रुसलेला वरुणराजा आणि आग ओकणारा सूर्य.. या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे.

         लोकांना झाडं लावण्यासाठी उद्युक्त करणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे. तसेच झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा हेतू असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणणे. प्रत्येक माणसाच्या मनात झाडं लावण्याचा विचार रुजवण्याचा हा एक प्रयत्न असल्यामुळे या स्पर्धेत राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक यांनी उत्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन मातृसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्या सावंत, ठाणे आणि शिक्षक ध्येयचे मधुकर घायदार, प्रभाकर कोळसे, डॉ. सुधीर अग्रवाल, वसुधा नाईक, अर्चना भरकाडे, सुरेखा उजगरे, भाग्यश्री पवार, कैलास बडगुजर, कविता चौधरी, डी. जी. पाटील, संदीप बेलदार, मेघा पाटील, अविनाश गंजीवाले, उदय माळगावकर, दिवाकर मादेशी, संजय पवार, अश्विनी दीक्षित यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here